भागलपुर एक्सप्रेसमधुन तरुणाला फेकले – जळगाव रेल्वेस्थानकाजवळील घटना; युवक गंभीर

0

जळगाव | प्रतिनिधी :  बुर्‍हाणपुर येथून भागलपुर एक्सप्रेसने तरुण जळगावात येत होता. जागेवरुन अन्य प्रवाशी युवकांशी तरुणाचा वाद झाला. त्यामूळे तरुणाला काहींनी धावत्या रेल्वेतुन फेकले. ही घटना जळगाव रेल्वेस्थानकानजीक दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत जखमीच्या नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, बुर्‍हाणपुर लालबाग येथे साबीर शेख जुम्मा (वय २३)हा युवक राहतो. त्याचे काका शेख रहेमान शेख रसुफ हे जळगावातील खंडेरावमध्ये राहतात. जळगावात काकाकडे भागलपुर एक्सप्रेसने बुर्‍हाणपुरहून साबीर शेख येत होता.

रेल्वेत गर्दी होती. त्यामूळे जागा मिळविण्यासाठी साबीर शेख याने अन्य प्रवाशी तरुणांना विनंती केली. यावेळी त्या तरुणांशी रेल्वेतच साबीर शेख याचा प्रवास करणार्‍या काही युवकांसोबत त्याचा वाद झाला. हा वाद विकोपाला जावून प्रवाशी तरुणांनी साबीर शेख जुम्मा याला जळगाव रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेतून फेकून दिले.

धावत्या रेल्वेतुन बाहेर फेकले गेल्याने साबीर याच्या डोक्याला व चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली. ही घटना जळगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली. दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत साबीर शेख हा रेल्वेस्थानकावर आला. यानंतर रिक्षाने साबीर खंडेराव नगरातील काका शेख रहेमान शेख रसुफ यांच्याकडे गेला.

पुतण्या साबीर शेख जुम्मा याला चेहर्‍यावर व डोक्यावर गंभीर जखमा पाहुन शेख रेहमान हे घाबरले. पुतण्याकडून घडलेला प्रकार जाणुन घेतल्यानंतर साबीर शेख याला लागलीच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचेे वैद्यकीय सुत्रांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*