भाऊ माझा बाहुबली…बाजारपेठ राख्यांनी सजली

0

अर्जुन राजापुरे @ अहमदनगर

शहरातील कापडबाजार, नवीपेठे, चितळे रोड, दिल्लीगे, माळीवाडा, केडगांव, सावेडी, प्रोफेसर कॉलनी चौक, भिंगार यांच्यासह विविध भागातील राखी स्टॉल गर्दीने फुलून गेली आहे. यंदा राख्याच्या दरामध्ये 10 ते 15 टक्क्यांनी भाववाढ झाली असल्याने राख्याचे दरदेखील वाढले आहे.
बहीण व भावाच्या नात्यातील प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन या सणाला हिंदू संस्कृतीमध्ये अन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे चिमुकल्या मुलींपासून सर्व महिलांना रक्षा बंधन सणाचे वेध लागले आहे. हा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या भाऊरायांच्या हातावर शोभेल अशी राखी अनेक महिला वर्ग खरेदी करत होता. कुणी चुंदनाची राखी, बाजारपेठेमध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या दिसून येत आहेत. शहरातील बाजारपेठे मध्ये डॉयमड राखी, गोल्डन झालर असलेल्या राख्या, मणी, मोती, रंगीबेरंगीे खड्यांची डिझाईन असलेली राखी, स्वस्तिक, गणपती, ओम, रुद्राक्ष लावलेल्या राख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच देवाला बांधण्यासाठी देव गोंडा नावाची राखी देखील बाजारात उपलब्ध झाली आहे. यासोबतच बहीणीला भेटवस्तू देण्यासाठी दादांची सुध्दा बाजारपेठेत गर्दी होत आहे.

10 रूपयांपासून हजारो रूपयांपर्यंत राख्या
शहरातील बाजारपेठेमध्ये 10 रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंतच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. डॉयमड,मोती,गोल्डन झालर असलेल्या व रंगीबेरंगी खड्याची डिझाईन असलेल्या राखीची किंमत या वर्षी वाढली आहे. बाजारात या आकरांच्या राख्या 60 ते 150 रूपयापर्यंत या राख्या उपलब्ध आहेत. तसेच चांदीची कोंटिंग असलेल्या राखीला सुद्धा यंदा बाजारात मोठी मागणी आहे.

खरेदीदारांचा उत्साह कायम
शहरातील विविध ठिकाणी रख्याची अनेक दुकाने लागली आहे. मात्र अनेक भागातील लोक हे मध्यवर्ती भागात असणार्‍या दुकानाला प्राधन्य देतात. यंदा बाहुबली राखीसोबतच छोटा भीम, डॉरेमॉन, शिंचॅन, बेनटेन, स्पायडर मॅन, या राख्यांबरोबर खडे, मोती, हिर्यांच्या राख्यांना ग्राहकांची चांगली मागणी आहे. तसेच यंदा राख्याच्या दरामध्ये 10 ते 15 टक्क्यांनी भाववाढ झाली असली तरी नागरीकांमधील उत्साह कमी झालेला नाही.
-सचिन टोणपे, विक्रेता

चंदेरी-सोनेरी राख्या हद्दपार
मागील काही वर्षापूर्वी बाजारपेठेमध्ये चंदेरी-सोनेरी यासारख्या चमकीचा कागद, प्लॅस्टिकची वेगवेगळ्या आकाराची फूले, रंगीत स्पंज असलेल्या राख्या यंदा मात्र बाजारपेठतून नाहीशा झाल्या आहेत. त्यांच्या जागा आता डॉयमट राखी, मणी, मोतीच्या डिजाईल असलेल्या राख्यानी घेतली आहे.

बच्चे कंपनीच्या राख्या
चिमुरड्या भाऊरायांसठी बाजारात बाहुबली, मिकी माऊस, डोरमोन, पोकेमॉन, छोटा भीम, स्पायडरमॅन, बालगणेश, टॉम अँड जेरी, ऍग्री बर्ड, मोटू-पतलू, टेडी, लाईट लागणारी राखी यासारख्या कार्टन रूपात असलेल्या राख्याना बाजारात मोठी मागर्णी आहे. तर सर्वात जास्त मागणी ही बाहुबलीच्या राखीला असल्याचे दिसते.

 

LEAVE A REPLY

*