Type to search

नंदुरबार

भरधाव ट्रालाची ट्रकला धडक, ट्राला चालक जागीच ठार

Share

आमलाड ता. तळोदा । वार्ताहर – तळोदा तालुक्यातील नळगव्हाण फाटयाजवळ अंकलेश्वर कडुन भरधाव वेगाने येणार्‍या ट्रालाने समोरून येणार्‍या ट्रकला धडक दिली.यात ट्राला रस्त्याच्या खाली उतरल्याने झालेल्या अपघाताते ट्रालावरील चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुल शेख, युसूफ शिकलीकर रा.जैताणे ता.निजामपूर जि.धुळे हा ट्रक (डी ए.आर.9308) ने अंकलेश्वरकडे जात असतांना समोरून येणारा ट्राला (क्र.एम.एच. 21- 5517) यावरील चालकाने भरधाव वेगात चालवुन ट्रालाला धडक दिली.या अपघातात ट्राला रस्त्यावरून उतरून खाली गेल्याने ट्रालावरील चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. उपचार घेत असतांना त्याचा मृत्यू झाला.चालकाचे नाव कळू शकले नाही. ट्रक चालक अब्दुल शेख युसूफ शीकलीकर याच्या फिर्यादीवरून संबंधीत ट्रालाचालकाविरूद तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ किसन वळवी करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!