भरधाव गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत; आरोपीस सश्रम कारावास

0

भानसहिवरा (वार्ताहर)- भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरुन नेवासा येथील न्यायालयाने सहा महिने व तीन महिने सश्रम कारावास व एकूण 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

 
या खटल्याबाबत माहिती अशी की, 16 डिसेंबर 2007 रोजी आरोपी संजय किसन कंक याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगाने चालवून नेवासा-श्रीरामपूर रोडने येणारे सुभाष शेषराव नवथर यांना जोराची धडक देऊन त्यांचे मृत्यूस कारणीभुत झाला. त्याचेविरुध्द नेवासा पोलीसांनी नेवासा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यामध्ये पुराव्यावरुन नेवासा न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एम. वाय. डोईफोडे यांनी आरोपी संजय किसन कंक (रा. करजगाव ता. नेवासा) यास दोषी ठरवून इंडीयन पिनल कोड कलम 304 अ खाली 6 महीने सश्रम कारावासाची शिक्षा व रु. 5हजार दंड तसेच कलम 379 खाली 3 महीने सश्रम कारावासाची शिक्षा व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

 

दंड न भरल्यास आणखी अनुक्रमे दिड महिना व 1 महिना अशी शिक्षा शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम वसूल झाल्यास कलम 357(1) फौ. प्र. सं. अन्वये जखमी श्रीमती सविता सुभाष नवथर हिला नुकसान भरपाई म्हणून 5 हजार रुपये व बालम राजू कुरेशी यास दोन हार रुपये भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला. सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. एस. एस. कुलकर्णी यांनी काम पाहीले.

LEAVE A REPLY

*