Type to search

नंदुरबार

भरती प्रक्रीयेबाबत आवाहन

Share

नंदुरबार । संचालक, लेखा व कोषागारे मुंबई यांनी 9 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार, लेखा लिपीक/लेखापरीक्षा लिपीक व कनिष्ठ लेखापाल/कनिष्ठ लेखापरीक्षक या गट क या संवर्गाच्या महापरीक्षा यांच्याकडून घेण्यात आलेल्या परिक्षेचे निकाल ुुु.ारहररिीळज्ञीहर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

गुणानुक्रमाने तात्पुरत्या विचाराधीन उमेदवारांची यादी संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांच्या ुुु.ारहरज्ञेीह.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरील एाश्रिूेशश लेीपशी-ीशर्लीीळीांशपीं र्ीीश्रश या टॅबवर उपलब्ध आहे व सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक या विभागीय कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द केलेली आहे. उमेदवार त्यांच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे निकालाची खात्री करु शकतील. भरतीच्या पुढील प्रक्रियेअंतर्गत उमेदवाराच्या कागदपत्रांची तपासणी 22 ते 29 जुलै या कालावधीत कार्यालयीन वेळेत सहसंचालक, लेखा व कोषागारे या विभागीय कार्यालयात होणार आहे.

25 जुलैपर्यंत उमेदवारांना पत्र न मिळाल्यास त्यांनी सहसंचालक, लेखा व कोषागारे, लेखा कोष भवन नाशिक यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहसंचालक निलेख राजुरकर यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!