Type to search

धुळे

भडणे परिसरात पावसाची उघडीप, शेतीकामांना वेग

Share

भडणे । शिंदखेडा तालुक्यातील भडणे परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग आला आहे.

पावसाने थैमान घातल्यामुळे शेतातील पीक तब्बल वीस दिवसांनी पावसाने उघडीप दिल्याने शेतात गवत तसेच शेतातील पिके पिवळी पडली आहेत. कापूस पिकास खत फवारणी व कोळपणी यासाठी शेतकरी शेतात काम करताना दिसत आहे. तब्बल चार वर्षांपासून परिसरात दुष्काळाशी सामना करावा लागला होता. चार वर्षांपासून विहिरींना पाणी नसल्यामुळे परिसरातील जनावरे विकली गेली होती गुरांना चारा न होता मात्र यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळे विहिरींना पाणी तसेच गुरांना चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.

मात्र पावसाने आठ दिवस विश्रांती दिल्यास शेतकरी वर्ग शेतातील सर्व काम आटोपून सज्ज राहिल, वीस दिवसांपासून मजुरांना हाताला काम नव्हते. यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती पावसाने उघडीप दिल्यामुळे मजुरांना फवारा मारण्यासाठी तीनशे रुपये, कोळपणी साठी अडीशे रुपये रोजगार मिळू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे शेतकरी वर्गांना आता मजूर कामासाठी बाहेर गावाहून आणावं लागत आहे गावात मजूरवर्ग मिळत नसल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!