‘भज्जी’च्या नावावर खास विक्रमाची नोंद

0
चेन्नई । चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात अनुभवी खेळाडू हरभजन सिंगने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये स्वत:च्या गोलंदाजीवर सर्वाधिक झेल (कॉट अ‍ॅण्ड बोल्ड) घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याने सहाव्या षटकात मोईन अलीचा झेल पकडत हा कारनामा केला. याचसोबत त्याने विंडीजचा डेन ब—ाव्होचा विक्रम मोडीत काढला.

हरभजन सिंगने 10 ’कॉट अ‍ॅण्ड बोल्ड’ विकेट घेतले. या यादीत तो पहिल्या स्थानी आहे. तर डेन ब—ाव्हो दुसर्‍या तर सुनील नरेन (7) आणि चौथ्या स्थानी किरोन पोलार्ड (6) आहे. कॉट अ‍ॅण्ड बोल्ड विकेट घेण्यात विंडीज खेळाडूंचा बोलबाला आहे.

हरभजन सिंगने पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने 4 षटकात 20 धावा देत 3 गडी बाद केलेत. त्यात कर्णधार विराट कोहली, मोइन अली आणि एबी डिविलियर्स या दिग्गज फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले. त्यामुळे बंगळुरूचा संघाचा 70 धावांत खुर्दा झाला.

चेन्नईने हा सामना 7 गडी राखून जिंकला. या विजयाचा हिरो हरभजन सिंग ठरला. बहारदार कामगिरीमुळे त्याला सामनावीरचा किताब देण्यात आला.

LEAVE A REPLY

*