भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

0

नाशिक : जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला भगूर नगरपालिकेने स्वा.विर सावरकर सभागृह न दिल्याने नगरपालिकेचे आर्थिक नुकसान तर झालेच पण महिलांचा महिलादिनीच अवमान नगरपालिकेकडून झाल्याने भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जागतिक महिला दिनाच्या दिवशी भगूर नगरपालिकेच्या मालकीचा स्वा. विर सावरकर हॉल महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी दुपारी 2 ते 7 या वेळेसाठी आम्ही अर्जाव्दारे मागणी केली होती. मुख्याधिकार्‍यांकडून ती वेळ उपलब्ध नसल्याचे पत्राद्वारे कळविल्यानंतर आम्ही सकाळी 10 ते 7 या दरम्यान कुठलेही 3 तास महिलांच्या कार्यक्रमासाठी सभागृह द्यावे अशी मिळावा मागणी मुख्याधिकार्‍यांना अर्जाव्दारे केली होती.

नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांकडून दिवसभर हॉल उपलब्ध नसल्याचे उत्तर दूरध्वनीवर देण्यात आले. व नगरपालिकेचा महिला दिनाचा कार्यक्रम सावरकर हॉलमध्ये दिवसभर होणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात कुठलाही कार्यक्रम हॉलमध्ये झाला नाही. महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी राजकीय हेतूने प्रेरित होऊन हॉल न दिल्याने भगूरच्या रहिवासी असलेल्या महिलांचाही अवमान झाला आहे.

याबाबत योग्य ती चौकशी करून भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी व आम्हा महिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेवटी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, सानिया कुडचिकर, पूनम बर्वे, रुपाली व्यवहारे, कुंदा क्षीरसागर, वैशाली देवगिरे, भारती बलकवडे, मंगल भालेराव, पूजा डावरे, अर्चना पाश्चा, सुलताना शेख, कोमल निकाळे आदींसह युवती व महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

*