भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे निवेदन

0

नाशिक,दि.१८ :- जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला भगूर नगरपालिकेने स्वातंत्र्यवीर सावरकर हॉल न दिल्याने नगरपालिकेचे आर्थिक नुकसान तर झालेच, पण महिलांचा महिला दिनी अवमान नगरपालिकेकडून झाल्याने भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व संबंधितांवर कारवाई होण्यासाठी आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी आपल्या शिष्टमंडळासोबत नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, दि. ०८ मार्च २०१७ ह्या जागतिक महिला दिनाच्या दिवशी भगूर नगरपालिकेच्या मालकीचा स्वातंत्र्यवीर सावरकर हॉल महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी दुपारी २ ते ७ या वेळेसाठी आम्ही अर्जाव्दारे मागणी केली होती.

मुख्याधिकाऱ्यांकडून ती वेळ उपलब्ध नसल्याचे पत्राद्वारे कळविल्यानंतर आम्ही सकाळी १० ते ७ या दरम्यान कुठलेही ३ तास महिलांच्या कार्यक्रमासाठी हॉल मिळावा अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांना अर्जाव्दारे केली होती. मात्र मागितलेल्या वेळेत नगरपालिकेचा कुठलाही कार्यक्रम हॉलमध्ये झाला नाही दिवसभर हॉल रिकामा होता,  याबाबत योग्य ती चौकशी करून भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी व आम्हा महिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेवटी केली आहे.

LEAVE A REPLY

*