Type to search

धुळे

भगवा चौक गणेश मंडळ पूरग्रस्तांना करणार मदत!

Share

धुळे | येथील भगवा चौक गणेश मंडळाचे यंदाचे १८ वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे यंदाही भगवा चौक गणेश मंडळातर्ङ्गे गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. मंडळातर्ङ्गे दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, राजकिय, आरोग्य विषयक व चालू घडामोंडींवर सजीव देखावाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असते. यंदाही भगवा चौक गणेश मंडळ येथे सजीव देखावा सादर करण्यात येणार आहे.

भगवा चौक गणेश मंडळातर्ङ्गे दरवर्षी प्रमाणे दहिहंडी साजरी करण्यात येत होती, परंतु शहरातील पांझरा नदीलगत आलेल्या पुर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही सर्व स्थिती बघता यंदा दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारा खर्च पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे.

तसेच भगवाचौक मंडळ गणेश उत्सव जल्लोषात साजरा करत असतो. परंतु यंदा पुरग्रस्तांना भगवाचौक मदत करणार असुन दहिहंडी साठी लागणारा खर्च आणि भगवा चौक गणेश उत्सवात खर्च कमी करणार आहेत.

आज दि. २५ ऑगस्ट रोजी भगवा चौक गणेश मंडळाचे भूमी पूजन परिसरातील जेष्ठ नागरिक बबनराव जाधव, मुन्शीशेठ भगत, अनिलशेठ बाङ्गना, अध्यक्ष सुरेशकाका जडे, मिनाक्षी वानखेडकर, बेबीताई पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख म्हणुन उपस्थित संस्थापक भुपेंद्र लहामगे, नंदकुमार गोरे, ऍड. पंकज गोरे, महानगरप्रमुख संजय गुजराथी, विभागप्रमुख रामदास कानकाटे, दिनेश माळी, चंद्रकांत बागुल, केशव बहाळकर, गणेशमल जैन, स्वागताध्यक्ष सुहास शिर्के, अनिल खिवसरा, मनोज धात्रक, निधी संकलन दिपक गोरे, खजिनदार प्रविण मुर्तडक, आप्पा पाखले, सलीम भगवा, नितीन धात्रक, आप्पा भडागे, सचिव राजेंद्र विभांडिक, पंकज जैन, जितेंद्र धात्रक, बाळु पेडवाल, बाळु पाटील, कुणाल कानकाटे, विशाल खिवसरा, कैलास मराठे, अजय ओझरकर, मंगेश पिंगळे होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!