‘ब’ सत्ताप्रकारच्या शर्तभंगप्रकरणी ११ जणांना नोटीस

0

जळगाव |  प्रतिनिधी : ‘ब’ सत्ताप्रकारची जमिन विनापरवानगी खरेदी करून शर्तभंग केल्याप्रकरणी शहरातील ११ जणांना उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

‘ब’ सत्ताप्रकारची जमिन खरेदी करण्यापुर्वी उपविभागीय अधिकार्‍यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अशी जमीन खरेदी करतांना मुल्यांकनाच्या ५० टक्के रक्कम नजराणा म्हणुन भरावा लागतो. अन्यथा प्रशासनाकडुन दंड म्हणुन ७५ टक्के रक्कम नजराणा म्हणुन भरावी लागते.

शहरातील अशाच ११ जणांनी विनापरवानगी ‘ब’ सत्ताप्रकरची जमिन खरेदी केली. याप्रकरणी शर्तभंग झाला म्हणुन ज्योती वसंतराव कोल्हे, प्रमोद रामदास पाटील, ऋषिकेश रघुनाथ राव, राजेंद्र मधुकर कुळकर्णी, पद्मचंद रामनाथ वर्मा, कलाबाई प्रकाश सोनवणे, दिलीप माधव चौधरी, अतुलबी मर्द शे कादर शेख, शंकरलाल रमेशलाल लुंड, सुनंदा सुरेश राणे, इंदीराबाई प्रतापराव वरयानी या ११ जणांना उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

LEAVE A REPLY

*