ब्रिटिश राजघराण्यात कोणाचीही प्रिन्स-प्रिन्सेस होण्याची इच्छा नाही : प्रिन्स हॅरी

0
ब्रिटनच्या राजघराण्यातील नवी पिढी राजगादीवर बसण्यास फारशी उत्सुक दिसत नाही.
कारण कोणालाही आता राजा-राणी होण्याची मुळीच इच्छा नाही, असे खुद्द प्रिन्स हॅरी यांनी स्पष्ट केले आहे.
राजघराण्याची कर्तव्ये वेळोवेळी बजावण्यात मात्र कसूर केला जाणार नाही, हेदेखील त्यांनी आवर्जून सांगितले.
राजा किंवा राणी होण्यासाठी राजघराण्यात कोणी उत्सुक आहे का? या प्रश्नावर ३२ वर्षीय हॅरी म्हणाले, मला तसे वाटत नाही. परंतु मी तर केवळ राजघराण्याची कर्तव्ये पार पाडीन.
आम्ही आता आमच्यासाठी अनेक गोष्टी करत नाहीत. केवळ लोकांच्या चांगल्या भावनांचा आदर करणे हा त्यामागील हेतू आहे. लोकांना माझ्यात तसा फार रस अाहे, असे मला वाटत नाही. कारण आता विल्यम यांना मूल झाले आहे.
म्हणून प्रिन्स जॉर्जकडे लोकांचे लक्ष आहे. खरे तर मला युवराजापेक्षा काही तरी वेगळे करण्याची खूप इच्छा अाहे.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलीप यांना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर किंग एडवर्ड रुग्णालयात उपचार सुरू होते. ९६ वर्षीय फिलीप दोन रात्री डॉक्टरांच्या निगराणीखाली होते. त्यांची प्रकृती चांगली आहे. संसर्ग झाल्यानंतरही त्यांची प्रकृती गंभीर नव्हती. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना दाखल करण्यात आले होते.
गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

LEAVE A REPLY

*