ब्रिटनच्या पंतप्रधान ‘थेरेसा मे’च; विश्वासदर्शक ठरावात विजय

0

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचा विश्वासदर्शक ठरावात विजय झाला आहे.

 

संसदेचा तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना एप्रिल महिन्यात थेरेसा मे यांनी अचानक मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या होत्या.

ब्रेग्झिटचा निर्णय पुढे रेटण्यासाठी आवश्यक बहुमत हुजूर पक्षाला या निवडणुकांत मिळेल, असा मे यांचा अंदाज होता. पण हा अंदाज मतदारांनी सपशेल फोल ठरवला.

थेरेसा मे यांच्या हुजूर पक्षाचे ३१८ खासदार निवडून आले होते. तर मजूर पक्षाने अनपेक्षित यश मिळवत २६१ जागांवर विजय मिळवला. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी मे यांना शेवटी डेमॉक्रॅटिक युनियनिस्ट पक्षाची मदत घ्यावी लागली.

विश्वासदर्शक ठरावात मे यांच्या विरोधात मतांची जुळवाजूळव करण्यात मजूर पक्षाचे ज्येष्ठ नेते जेरेमी कॉर्बिन सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले.

ब्रिटिश संसदेत हुजूर पक्ष आणि मजूर पक्षानंतर स्कॉटिश नॅशनल पक्षाचे सर्वाधिक ३५ खासदार निवडून आले होते.

LEAVE A REPLY

*