ब्राम्हणपुरीत भरदिवसा धाडसी चोरी : ४० तोळे सोने लंपास

0

ब्राम्हणपुरी, ता. शहादा I वार्ताहर  :  शहादा तालुक्यातील ब्राम्हणपुरी येथील भरत मदन पाटील यांच्या भर रस्त्यावरील घर फोडून चाळीस तोळे सोने लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास घडली.दुपारी 2 वाजेला ही घटना उघडीस आल्या नंतर एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी ठसे तज्ज्ञ श्वान पथक मागवून चोरट्यांचा शोध घेण्यास प्रयन्त केला.दरम्यान सेंट्रल बँक चे सी सी टी वि कॅमरा तपासणी करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की भरत मदन पाटील व त्यांची हे दोघी राहत होते.त्यांची पत्नी आपल्या मुलाकडे नाशिक येथे गेले होते व भरत पाटिल हे सोमवारी सकाळी आपल्या शेतात गेले नंतर दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारस शहादा येथे आपल्या खाजगी कामासाठी गेले असता परत 2 वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या घराच्या दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता पण ते उघडले नाही मग त्यांनी आपल्या मागचा बाजूचा दरवाजा उघडण्यासाठी गेले असता त्यांना दरवाजा फोडलेला दिसला त्यांनी आपल्या बेड रूम मध्ये पहाणी केली असता त्यांना आपल्या रूम मधील कपाट उघडे दिसले व सर्व कपडे पलगावर पडलेलं दिसले. सगळ्या सामानाची नासाधुम केलेली दिसली व कपाटातील ४० तोळे सोने व चांदी चे पूजेचे ४ ताट व ४ ते ५ हजार रोकड चोरीस गेल्याचे समजले . ,

त्यांनी तात्काळ आपल्या नातेवाईकांना  व पोलीस पाटील रवींद्र पवार यांना संपर्क केला.   लागलीच शहादा पोलिसांना कळविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी महारु पाटील,पोलीस निरीक्षक संजय शुक्ल ,पोलीस उप निरीक्षक दीपक बागुल,हवालदार मनोज सरदार,विकास कापुरे,देवा गावित,गुरुदेव सोनवणे यांनी घटना स्थळी धाव घेतली.त्या नंतर श्वान पथक दाखल झाले .

श्वानाने रस्त्यालगत मार्ग पाहिला. ठसे तज्ज्ञ ए. पी.आय योगेंद्र राजपूत पोलीस हवालदार प्रकाश भाबड ,संजय रामोळे,दीपक भोये, देविदास दाभाळे ,अभय राजपूत यांनी ठसे घेतले.

LEAVE A REPLY

*