बोल्हेगाव रस्त्याचे भाग्य उजळले; कदम व बोरुडे यांच्याकडून पाहणी

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – बोल्हेगाव, नागापूर या भागाचा मनपात समावेश होऊन 10 वर्षे झाली. मात्र, शासनाकडून या भागासाठी विशेष निधी न मिळाल्याने अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. आता मनपात शिवसेनेची सत्ता असून, येथील प्रश्‍न सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. लवकरच बोल्हेगाव फाटा ते गणेश चौकापर्यंत मोठी रहदारी असून, हा रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या भागात बंद पाईपगटार अभावी रस्त्यावर सांडपाणी वाहत होते. त्यामुळे रस्ते खराब झाले होते. आता बंद पाईप गटारीचे काम पूर्ण होऊन त्यावाटे पाणी वाहून जाईल व रस्त्यावर पडलेल्या खड्डयांना पॅचिंग करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील अडचणी दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
बोल्हेगाव फाटा ते राघवेंद्र स्वामी मंदिर व गणेश चौकापर्यंत बंद पाईप गटार व पॅचिंगचे काम करण्यात आले असून, त्यामुळे येथील रस्त्याचा व वाहून जाणार्‍या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. या कामाची शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम व नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आशिष सरोदे, सूरज ठोंबे, संकेत आढाव, योगेश सरोदे, राजू जगताप, सागर मंदिलकर, आशिष शिरसाठ, वैभव ताटे, सागर जपे, सूरज पाचारणे, अजित वाकडे, सूरज मांगडे, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.
डॉ.बोरुडे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत या भागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. बोल्हेगाव फाटा ते राघवेंद्र स्वामी मंदिर व गणेश चौक या भागातील नागरिक खड्डे व रस्त्यावर वाहणारे पाणी यामुळे त्रस्त झाले होते. रस्ता पॅचिंग व बंद गटारीचे काम महापौर सुरेखा कदम यांच्या माध्यमातून मंजूर करून घेऊन ते सुरू केले. आता हे काम पूर्णत्वाकडे असून, रस्ता पॅचिंगचे कामही पूर्ण होत आले आहे, असे ते म्हणाले.
फोटो ओळी
बोल्हेगाव फाटा ते राघवेंद्र स्वामी मंदिर व गणेश चौकापर्यंत बंद पाईप गटार व पॅचिंगचे काम करण्यात आले असून, त्यामुळे येथील रस्त्याचा व वाहून जाणार्‍या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. या कामाची शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम व नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी पाहणी केली. यावेळी आशिष सरोदे, सूरज ठोंबे, संकेत आढाव, योगेश सरोदे, राजू जगताप, सागर मंदिलकर, आशिष शिरसाठ, वैभव ताटे, सागर जपे, सूरज पाचारणे, अजित वाकडे, सूरज मांगडे, प्रशांत पवार आदी.

 

LEAVE A REPLY

*