Type to search

जळगाव

बोरींगचे साहित्य चोरणार्‍या टोळीच्या एमआयडीसी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Share

जळगाव । नशिराबाद येथून बोरींगचे साहित्य चोरुन रिक्षेद्वारे शहरात येत असलेल्या टोळीच्या एमआयडीसी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहे. या संशयितांकडून चोरीचे बोरींग साहित्य व रिक्षा हस्तगत करण्यात आली असून तिन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी नाशिराबाद पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

जळगावातील बोरींग व्यवसायिक निलेश अग्रवाल यांच्या मालकीचे सबमर्सीबल पंप व मोटार, हॅमर, राप्टर, सबमर्सीबल मोटार पंप व कनेक्टर असा बोरींग सामान नशिराबाद-सुनसगाव येथील गोडावूनमधून चोरून तिघे रिक्षेने जळगावात येत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी विजय पाटील व मनोज सुरवाडे यांना मिळाली. त्यानुषंगाने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सफौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, मनोज सुरवाडे, सचिन पाटील, किशोर पाटील, हेमंत कळस्कर, प्रविण मांडोळे यांनी सापळा रचून रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ एमएच 19 व्ही 5153 क्रमांकाची रिक्षा थांबवून शेख फिरोज शेख इकबाल, शेख असिम गुलाम पिंजारी, व नूर मेहबुब खाटीक सर्व रा. तांबापुरा या तिघांना ताब्यात घेतले. दरम्यान रिक्षेत बोरींगचे साहित्य मिळून आल्याने याबाबत तिघांना विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी नाशिराबाद-सुनसगाव रोडवरील गोडावूनमधून बोरींगचे साहित्य चोरले असल्याचे सांगितले. या तिन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी नाशिराबाद पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!