Type to search

धुळे

बोराडी परिसरात संततधार, लाखोंचे नुकसान

Share

बोराडी । संततधार पाऊस व पुरामुळे बोराडीसह परिसरात लाखोंचे नुकसान झाले आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून बोराडीसह परिसरात संततधार पावसामुळे नदी-नाल्याले धोक्याच्या पातळीवर वाहत होत्या. यामुळे बोराडीसह परिसरातील रस्ते व पुलाजवळील रस्ते खराब झाले तर काही ठिकाणी रस्तेच वाहुन गेले आहेत. शिरपूर तालुक्यातील व आदिवासी भागातील शेतकर्‍याचे शेतातील पिकांचे व काहीच शेतातील पिके वाहुन गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असून त्यांनी त्वरित शेताचे, पडलेले घराचे व पुरग्रस्त भागातील गावाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महसूल विभागाने त्वरित पंचनामे करावीत अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी केली आहे.

शिरपूर शहरासह तालुक्यात व आदिवासी भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे,पिकांचे व

घरे,दुकाने याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागात भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे स्वतः जावून पाहणी केली आहे. टेंभे,फत्तेपूर, शिरपूर शहर,बोराडी यांच्या सह दहा ते बारा गावातील पुर परिस्थिती निवारण्यासाठी मदत केली जात आहे.

संततधार पावसामुळे शिरपूर तालुक्यातील गावाचे व आदिवासी भागातील शेतकर्‍यांचे शेतातील पिकांचे व शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शिरपूर शहर व तालुक्यातील काही गावामध्ये पुराचे पाणी घरामध्ये व दुकानात शिरल्यामुळे नुकसान झाले आहे.

बोराडी जवळील आंबाळ नदी वरुन पाणी वाहत होते. म्हणून त्याठिकाणी डांबरी रस्ता उखडून गेला आहे. तर काही ठिकाणी मोठ-मोठी खड्डे पडली आहे. हा रस्ता वळणावरील असल्याने येथे वाहतूकीस धोका निर्माण झाला आहे. तर बुडकी गावाजवळ देखील पुलाजवळ रस्ता वाहून गेला आहे. तसेच बुडकी ते मालकातर पर्यंत व न्यु.बोराडी ते पनाखेड,सागवी दरम्यान रस्ते खराब झाले आहेत. पावसामुळे बोराडीसह परिसरातील नाल्यावर बांधण्यात आलेल्या बंधारार्‍या बाहेरील बाजू पुर्णपणे वाहून गेल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बोराडी येथील भरत पावरा यांच्या शेतात बुडकी धरणाचे पाणी शिरल्यामुळे पिकांसह पोल्ट्रीफाँममध्ये पाणी साचल्याने सुमारे चार ते पाच हजार कोंबडयाचा मृत्यू झाला आहे. यात सात लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच बोराडी येथील कृष्ण नगरातील (गोपाळ वाड्या) दिलीप वडार,आशाबाई गोसावी यांच्यासह परिसरातील पंधरा ते वीस मातीच्या घराची पडझड झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!