बोराडी डी.एड.कॉलेज येथे शिक्षकांना वंदन

0

बोराडी । वार्ताहर- किसान विद्या प्रसारक संस्था संचलित डॉ.बी.आर. आंबेडकर अध्यापक विद्यालय बोराडी येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन व किसान विद्या प्रसारक संस्थेचे माजी सचिव विश्वासराव रंधे यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करूण शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रथम व द्वितीय छात्रध्यापकांनी आजच्या संपूर्ण दिवसाचे कामकाज पाहिले. प्राचार्य, प्राध्यापक, लिपीक, शिपाई अशा सर्व भूमिका छात्रध्यापकांनी पार पाडल्या. या नंतर समारोप कार्यक्रमात छात्रअध्यापकांनी विद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर प्राध्यापक झालेल्या छात्रध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या नंतर अध्यापक विद्यालयातील ज्येष्ठ प्रा.एन. पी. पाटील यांनी मनोगतातून डॉ.राधाकृष्णन व दादासाहेब विश्वासराव रंधे यांच्या कार्याची माहिती विस्तृतपणे सांगितली.

अध्यक्षीय भाषणात विद्यालयाच्या प्राचार्य सु.ल.वैद्य यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडणार्‍या छात्रअध्यापकांचे कौतूक करून त्यांनी आपल्या मनोगतातून छात्रअध्यापकांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी अध्यापक विद्यालयाचे प्रा.ए.व्ही लुंगसे, प्रा.भलकार, प्रा.ए.आर भामरे प्रा.पी.एस.वाल्हे, भूषण पाटील, वैशाली भामरे, गोपीचंद बेडीस्कर, माधवराव ठाकूर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*