Type to search

धुळे

बोराडीत स्वाईनफ्ल्यूमुळे एकाचा मृत्यू

Share

बोराडी | येथील जितेंद्र सर्जेराव पाटील (वय ४४) यांचा स्वाईन फ्ल्यू आजारामुळे मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असताना आज सायंकाळी मृत्यू झाला.

येथील गायत्री अँक्वाचे संचालक जितेंद्र सर्जेराव पाटील यांना पाच ते सहा दिवसांपुर्वी अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना धुळे येथील सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मुंबई घेवून जाण्यास सांगितले होते. त्यावरून जितेंद्र पाटील यांना दि.२२ आँगस्ट रोजी मुंबई येथील जोतिबा रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी यांना स्वाईन फ्ल्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार सुरू असतांना त्यांचा आज मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या दि.२४ रोजी ९ वाजता बोराडी येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बोराडी येथे स्वाईन फ्ल्यू रुग्ण आढळल्यामुळे व त्याचे निधन झाल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी त्वरीत दखल घेऊन बोराडी गावात धुरळणी व विविध प्रकारच्या तपासणी करण्यासाठी पथक पाठवण्याची मागणी गावकर्‍यानी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!