बोरपाणी येथे तरुणाचा खून

0

धुळे / जागेच्या वादात साथ दिल्याच्या संशायावरुन तरुणाला मोटार सायकलीवर बसवून घेवून जावून मारहाण केली.

तसेच बोरपाणी ता. शिरपूर शिवारातील कॉलेज जंगलात पळसाच्या झाडावर दोरीने गळफास घेवून तरुणाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी एका संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, बडवाणी जिल्ह्यातील पानसेमल येथे राहणारी हिरुबाई भुर्‍या ब्राम्हणे (पावरा) हिचा पती भुर्‍या ग्यानसिंग ब्राम्हणे (वय38) याने गावातील कांतीबाई हिच्या घराच्या जागेत झालेल्या भांडणात कांतीबाईला भुर्‍याने साथ दिल्याचा संशय घेवून दि. 25 एप्रिलच्या सकाळी 11.30 ते 26 एप्रिलच्या सकाळी 8 वाजेदरम्यान संशयित धिरु उर्फ धिरेंद्र वांगा मेहता रा. राणीमोयदा याने भुर्‍याला मोटार सायकलीवर बसवून घेवून मारहाण केली.

तसेच बोरपाणी, ता. शिरपूर गावाच्या उत्तरेस फॉरेस्ट जंगलात बोरपाणी ते लंगडीघोटाळी रोडवर पळसाच्या झाडावर दोरीने भुर्‍याला गळफास देवून लटकवून दिले.

याबाबत हिरुबाई भुर्‍या ब्राम्हणे यांनी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 302 प्रमाणे संशयित धिरु उर्फ धिरेंद्र वांगा मेहताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

शेतकर्‍याला मारहाण- मांडळ, ता. धुळे येथे राहणारे राजेंद्र भास्कर पाटील व त्यांचा भाऊ पंढरीनाथ या दोघांना हिलाल नामदेव पाटील याने शेतात बोलावून घेवून शिवीगाळ केली. त्यामुळे शिवीगाळ का केली? असे राजेंद्र पाटील यांनी विचारल्याचा राग येवून दीपक हिलाल पाटील याने कुर्‍हाडीने तर हिलाल पाटील याने देखील कुर्‍हाडीने राजेंद्र पाटील यांच्या डोक्यावर मारुन जखमी केले. तसेच हाताबुक्क्यांनीही मारहाण केली. तर मालुबाई हिलाल पाटील हिने शेतातील घरात जावून तिखट आणून ते राजेंद्रच्या अंगावर फेकले व ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत राजेंद्र भास्कर पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 326, 323, 504, 506, 34 प्रमाणे हिलाल नामदेव पाटील, दीपक हिलाल पाटील, मालूबाई हिलाल पाटील यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगल कार्यालयात चोरी- धुळे शहरातील मराठा मंगल कार्यालयाच्या भिंतीवरुन अज्ञात चोरट्याने भांडार गृहात प्रवेश करुन भांडार गृहातून पितळी भांडे 12, पितळी पराती दोन, पातेले दोन व इतर साहित्य असा 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत अविनाश नरेंद्र बहादुर्गे यांनी फिर्याद दिली. भादंवि 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेचा छळ- डांगुर्णे, ता. शिंदखेडा येथे राहणारी सौ. शोभाबाई सुनिल कोळी (वय24) या विवाहितेने विहिर खोदण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून विवाहितेचा सन 2015 पासून ते 2016 पर्यंत सुनिल वेडू कुवरसह 12 जणांनी छळ केला. तसेच विवाहितेचा पती नोकरीस आहे असे सांगून फसवणूक केली. याबाबत सौ. शोभाबाई सुनिल कोळी यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 420, 406, 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे सुनिल वेडू कुवर, वेडू धोंडू कुवर, कमलाबाई वेडू कुवर, मनिषा दयानंद शिरसाठ, दयानंद देवीदास शिरसाठ, प्रमिला सुभाष कोळी, सुभाष धर्मा कोळी, राजेंद्र भाईदास कोळी, नगराज भाईदास कोळी, लताबाई राजेंद्र कोळी, रावसाहेब बोरसे, अभिमन देवकशा कुवर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलीची छेड; एकावर प्राणघातक हल्ला
धुळे शहरातील ग.नं. 14 मधील बालगोपाल विजय व्यायाम शाळाजवळ राहणारा प्रशांत राजेंद्र खोंडे याने मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन शशिकांत उर्फ शशी बेगराज गुरव याने हातातील लाकडी दांडक्याने प्रशांतला मारहाण केली. त्यात त्याच्या डोक्याला खोलवर गंभीर जखम झाली. तसेच शशिकांतसह दोघांनी शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद संगीता मच्छींद्र ठाकरे यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात दिली. भादंवि 307, 504, 506, 34 प्रमाणे शशिकांत उर्फ शशी बेगराज गुरव आणि रोहित साळुंके यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सराफ व्यापार्‍याची फसवणूक
धुळे शहरातील तार गल्लीतील सराफ व्यापारी हितेश सुरेश सोनी यांनी त्यांच्या दुकानातील पोत गाठणारा कामगार साबीर शेख असगर पटवे याला एचडीएफसी बँकेत भरणा करण्यासाठी पाठविले असता त्यावेळी एचडीएफसी बँकेत अज्ञात व्यक्तीने साबीर शेख अजगर पटवे यांना खोटे सांगून विश्वास संपादन करुन चार लाख 65 हजार रुपये पळवून नेवून फसवणूक केली. याबाबत हितेश सुरेश सोनी यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भादंवि 420, 417 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

मोघण येथे घरफोडी
मोघण, ता. धुळे येथे दिलीप शामराव पाटील हे राहतात ते उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यांच्या कुटुंबासह घराच्या छतावर झोपले होते. पहाटे 4 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरात उघड्या जिन्याद्वारे प्रवेश केला. घरातील रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा पावणे दोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. तसेच घरासमोर लावलेली मोटार सायकलही चोरुन नेली. सकाळी पाटील कुटुंबिय झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मोहाडी पोलिस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरिक्षक शिरसाठ व कर्मचारी दाखल झाले. घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला. पाटील यांच्या घरापासून ते गावाबाहेरील रस्त्यापर्यंत श्वानने मार्ग काढला. त्यानंतर श्वानला माग गवसला नाही. याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनपोत लांबविली
धुळे शहरातील वलवाडी शिवारातील गोकर्ण सोसायटी प्लॉट नं. 11 मध्ये राहणार्‍या प्रमिला आत्माराम पाटील या त्यांच्या नातीसोबत इंद्रप्रस्थनगर येथील गौरी कांडप येथे मिरची दळण्यासाठी दि. 5 मे रोजी पहाटे 6 वाजता पायी जात असतांना दोन अज्ञात व्यक्ती एमएच18 जेजी2692 क्रमांकाच्या मोटार सायकलीने आले व त्यांनी प्रमिला पाटील यांच्या गळ्यावर थाप मारुन तीन हजार 600 रुपये किंमतीची एक ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत चोरुन नेली. याबाबत प्रमिला आत्माराम पाटील यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भादंवि 392, 34 प्रमाणे अज्ञात व्यक्तीवरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

*