बोरद येथे उन्नत शेती, समृद्ध शेतकरी पंधरवाडा

0
बोरद ता. तळोदा / तळोदा तालुक्यातील बोरद येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात उन्नत शेती, समृध्द शेतकरी पंधरवाडयांतंर्गत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जि.प. सदस्य नरहर ठाकरे, विकासो चेअरमन कृष्णदास पाटील उपस्थित होते.
यावेळी ग्रा.पं. सदस्य मंगलसिंग चव्हाण, मंगेश पाटील, बैसिंग पवार, तुळशिदास पाटील, कृउबास उपसभापती दत्तात्रय पाटील, निवृत्त नायब तहसिलदार व्ही.जी. राजपूत आदीसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी आर.व्ही. पवार यांनी शासनाचा असलेल्या योजनाचा मोइया प्रमाणावर लाभ घेवून कसा विकास घडवू शकतो.

याबद्दल मार्गदर्शन केले. विषय तज्ञ आर.एम. पाटील यांनी सेंद्रीय शेती समूह शेती, बॉयगास प्रणाली गावातील स्वच्छता आदीसह विषयावर मार्गदर्शन केले.

 

LEAVE A REPLY

*