बोदवड तालुक्यातील तुर उत्पादक मेटाकुटीला!

0

पुरूषोत्तम गड्डम | बोदवड : बारदानाचे कारण दाखवून गेल्या महिनाभरापासून  नाङ्गेडच्या सरकारी यंत्रणेने तूर खरेदी बंद केली. आर्थिक दृष्ट्या पिचलेल्या शेतकर्‍यांना तूर पिकाने साथ दिली. मात्र तालुक्यात तूर खरेदी केंद्र  बंद झाल्याने  मातीमोल भावाने व्यापारी तूर खरेदी करित आहेत.

घाणखेड येथील तूर खरेदी केंेद्रावर आजही हजारो क्विंटल तूर पडून आहे. जर अवकाळी पाऊस आला तर संपूर्ण धान्य नष्ट होईल. अशी  परिस्थिती असतांना कोणीही शेतकर्‍यांचा कैवार घ्यायला तयार नाही.

यंदा  मान्सुन चांगला झाल्याने खरिपातील तूर पिक बरे उत्पादन देवून गेले, शेतकर्‍यांच्या हातात चार पैसे पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मात्र सरकारी यंत्रणेद्वारा होणारी तूर खरेदी बंद झाल्यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात हाल सुरू आहेत.

उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन-वराडे

बोदवड तालुक्यातील शेतशिवारात यंदा तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. कापूस पिक धोक्यात आल्याने  कपाशीचे उत्पन्न घटले. मात्र तुरीची साथ मिळाली म्हणून शासकिय तूर खरेदी केंेद्रावर तूर विक्रीसाठी आणली  जावू लागली. नाङ्गेडतर्ङ्गे तूरीला पाच हजारी क्विंटलचा भाव मिळत  होता.

मात्र तूर खरेदी बंद झाल्याने आज केंद्रावर हजारो क्विंटल तूर उघड्यावर पडून आहे. अशी संतप्त  प्रतिक्रिया कृउबाचे माजी सभापती अनिल वराडे यांनी दिली. तालुक्यात तूर खरेदी तात्काळ सुरू करावी, यासाठी दि. १० रोजी तालुक्यातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी  कार्यालयात जावून राहुल मुंडके यांच्याकडे निवेदन  सादर केल्याचेही अनिल वराडे म्हणालेे.

अवकाळी पाऊस आला तर…

बोदवड तालुक्यातील एक दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अशा परिस्थितीत जर अवकाळी पाऊस बरसला तर कोट्यावधी रूपयांच्या तूरीचे  अटळ आहे. तालुक्यातील घाणखेडे येथील तूर खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची तूर मोठ्या प्रमाणावर पडून आहे तूर खरेदी केंद्रामध्ये अशाप्रकारे तूर साठवण करण्याची व्यवस्था नाही, गोडावून नसल्यामुळे तूर उघड्यावर आहे.

त्यामुळे पाऊस आल्यास सर्वच तूर पाण्यात भिजून नष्ट होवू शकते. या नुकसानास जबाबदार  कोण असेल? असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

व्यापार्‍यांकडून होतेय लूट

नाङ्गेड किंवा इतर सरकारी  यंत्रणेद्वारा होणारी तूर खरेदी बंद झाल्यामुळे नाईलाजास्तव शेतकर्‍यांना  आपली तूर खाजगी व्यापारांकडे मोजावी लागत आहे. मात्र अनेक ठिकाणी व्यापारी भावामध्ये लुट करित असल्याच्या तक्रारी आहेत. खाजगी व्यापारी तूर साडेतीन ते चार हजार  क्विंटलप्रमाणे तूर खरेदी करित आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची प्रती क्विंटलमागे ८०० ते १००० रूपयांची  लूट होत आहे.

शासनाने तातडीने या प्रकरणी लक्ष घालून तात्काळ तूर खरेदी केंद्र सुरू करावे. यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांना  निवेदन देण्यात आले. त्यावेळी बोदवड भाजपाचे तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, जिल्हा दूध संघाचे संचालक मधूकर राणे, जि.प.सदस्य भानुदास गुरचळ, माजी कृउबा सभापती अनिल वराडे,  लालसिंग पाटील, डॉ.ब्रिजलाल जैन, प्रभाकर पाटील, अनिल चौधरी यांनी निवेदन देवून तूर केंद्रे तात्काळ सुरू करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

*