बोदवडला शेतकरी प्रश्नी कॉंग्रेस आक्रमक

0

बोदवड |प्रतिनिधी :  राज्यातील शेतकर्‍यांच्या रास्त मागण्या त्वरीत पुर्ण करुन विधानसभेतील १९ आमदारांचे निलंबन सरकारने त्वरीत मागे घ्यावे. यासाठी तालुक्यातील कॉग्रेस आक्रमक झाली. शहरातील प्रमुख मार्गावर रास्तारोको करुन कॉग्रेसजनांनी आपला निषेध नोंदविला.

BODWAD PHOTO (1)

भुसावळ पं. स. चे माजी सभापती विरेंद्रसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दिलीपसिंग पाटील, भरतसिंग पाटील, ईश्‍वर जंगले, मिलींद गुरचळ, आधार पाटील, परमेश्‍वर टिकारे, बापु देशमुख, सरदार पाटील, अजय गवळे, प्रमोद माळी, भगवान पाटील, आनंदा पाटील, शेख मेहबुब, अमोल राजपुत, सचिन पाटील, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

तहसिल मध्ये निवेदन – बोदवड शहरातील प्रमुख मार्गावर आंदोलन केल्यानंतर बोदवड तहसिल कार्यालयात शेतकर्‍यांसंदर्भातील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये शेतकर्‍यांची कर्जमाफी तातडीने करण्यात यावी, कर्जमाफीची रास्त मागणी करणार्‍या १९ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे.

बोदवड तालुक्यातील तुर खरेदी केंद्रात जलद गतीने मोजणी व्हावी तालुक्यातील पाणी टंचाई प्रश्‍नी उपाययोजना करावी, संभाव्य बारा टक्के वीज दरवाढ रद्द करण्यात यावी, व कर्जवसुली तातडीने थांबवुन नवीन कर्जवाटप करावे. इंदिरा आवास घरकुल वंचित लाभार्थ्यांना न्याय मिळावा. शेतकर्‍यांचे वीजबील माफ करावे, सबसिडीवरील गॅस सिलेंडरचे भाव कमी करावे. या मागण्या पुर्ण करण्यासाठी राष्ट्रीय कॉग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

*