Type to search

क्रीडा जळगाव

बॉक्सिंग स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक

Share

भडगाव| येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई विद्यामंदिर व सु. मा. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बॉक्सींग स्पर्धेत घसघशीत यश संपादन केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने कौतुक करण्यात आले. जळगाव येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग या स्पर्धेत १७ वर्षाआतिल ४० किलो वजन गटात विद्यालयाचा नववीचा चा विद्यार्थी स्वप्निल रविंद्र पाटील ने गोल्ड मेडल मिळवले. तर याच स्पर्धेत १९ वर्षाआतिल ५१ किलो वजन गटात अकराविच्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी जयेश रविंद्र पाटील या विद्यार्थ्यांने ब्रांझ मेडल मिळवले.

याशिवाय तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत विद्यालयाच्या १७ वर्षाआतिल मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रिडा शिक्षक डी. एस. पाटील, अमित पाटील, सतिष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या तिहेरी यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली पाटील, उपप्राचार्य एस. व्ही. शिंदे , पर्यवेक्षक ए. एम. पाटील यांनी कौतुक केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!