बेवारस बॅगेत आढळले 3 लाखांचे दागिने

0
भुसावळ । दि.15 । प्रतिनिधी- येथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र 3 वर एका बेवारस बॅगेत अडीच ते तीन लाखांचे दागिण्यांची बॅग दि. 14 रोजी सायंकाळी 7.30 वाजत लोहमार्ग पोलिसांच्या लक्षात आले.
संबंधित महिलेला याबाबत सुचना देण्यात आली आहे. याबाबत पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, शशी अरविंद गुप्ता ( रा. डहाणू पश्चिम, मुंबई) या दि. 14 जून रोजी पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवास करत होत्या.त्यांची बॅग अज्ञात चोरट्याने चोरी केली असावी.

ही बॅग येेथील रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र 3 वर बराच वेळ पडून असल्याने स्थानकारील व्हेंडर्स यांनी लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांनी बॅग जप्त करुन पोलिस स्थानकात आणून तपासणी केली असता बॅगेत सोन्याचा मोठा हार, 2 चैन, अंगठी, कानातील झुमके व चांदीचे पायल असा जाळपास अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांचे 80 ग्रॅम दागिणे अव शशी गुप्ता यांचे देना बँकेचे पासबुक, 7 साड्या, 2 जीन्स पँट, 5-6 शर्ट असा समान होता.

आधारकार्ड बँकेच्या पासबुकच्या आधारे पोलिसांनी गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असून त्या दि.16 रोजी भुसावळात दाखल होऊन याबाबत लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चोरट्याने रेल्वेतून महिलेची बॅग लंपास करुन घेऊन जात असताना कोणीतरी पाहिल्याच्या संशयावरुन किंवा बॅगेत काहीच मिळत नसल्याच्या अंदाजावरुन चोरट्याने बॅग फलाट क्र 3 वर फेकून दिल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

बॅग लंपास झाल्या बाबत गुप्ता यांनी चालत्या गाडीतील जीआरपी कर्मचार्‍यांना सुचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र बॅग आढळून आली नाही.

याबाबत, शशी गुप्ता दि. 16 रोजी भुसावळात दाखल झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान बेवारस बॅग आढळल्या बाबात लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास एपीआय उज्वलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रवींद्र पाटील करीत आहे.

 

LEAVE A REPLY

*