बेग पटांगणातील अतिक्रमणावर हातोडा

0

महापालिकेची कारवाई , अधिकारी-नागरिकांत वादावादी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील जुन्या महापालिका कार्यालयाशेजारी असलेल्या बेग पटांगणावरील अतिक्रमाणावर आज अहमदनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातोडा टाकला. महापालिकेच्याच मालकीच्या या पटांगणात अनधिकृतपणे अतिक्रमण करून ते बळकाविण्याचा प्रयत्न सुरू होता. कारवाई दरम्यान स्थानिक नागरिक व अधिकारी यांच्यात किरकोळ वादावादी झाली. उपायुक्त अजय चारठणकर यांच्या उपस्थितीत अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली.

शहरातील बेग पटांगण हा मनपाच्या मालकीचा मोठा भूंखड आहे. या ठिकणी सुमारे दीड एकरच्या परिसरात असणार्‍या मोकळ्या जागेत खाजगी वाहने, ट्रॅक्टर, बिल्डींग मटेरियल, पत्रे, दुकान तसेच बांधकामासाठी लागणारे साहित्य टाकून मोठे अतिक्रमण करण्यात आले होते. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मनपा उपायुक्त अजय चारठणकर यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विरोधी पथक पोहचले. त्यावेळी परिसरात असलेल्या नागरिकांनी या कारवाईचा आक्षेप घेतला. या पंटागणात असलेली सव्वा एकर जागा ही खाजगी मालकीची असल्याचे काही स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते. उपायुक्त चारठणकर यांनी संबधित जागेचे पुरवा आम्हाला सोमवार पर्यंत सादर करा असे स्थानिक नागरिकांना सांगितले. त्यामुळे जर सोमवार पर्यंत स्थानिक नागरिकांनी या जागेची कागदपत्रे सादर न केल्यास मंगळवारी राहिलेल्या जागेवरचे सर्व अतिक्रमण काढण्यात येईल व जागा महापालिका ताब्यात घेईल असे चारठाणकर यांनी ‘नगर टाइम्स’ शी बोलताना सांगितले.

मोठा पोलिस बंदोबस्त
बेग पटांगणावरील करवाई दरम्यान स्थानिक नागरिकांनी या कारवाई बाबत आक्षेप घेतल्यामुळे अधिकारी व नागरिकांची शब्दीक चकमक सुरु झाली. दरम्यान या ठिकणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करत वाद मिटविला. या करवाई दरम्यान या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दुपारी उशीरा पर्यंत मोहिम
बेग पटांगणाच्या जागेवर अनेक वर्षापासून जुनाट खाजगी वाहने, सिमेंट, वाळू, दुकाने मोकळया परिसरात उभारली होती. या मोकळ्या जागेतील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. संपूर्ण पटांगण हे मोकळे करून साफ सफाई करण्याचेे काम दुपारी उशीरा पर्यंत सुरु होते.

LEAVE A REPLY

*