बेकायदा गर्भपात प्रकरणी कोठडीत असलेल्या डॉ. शिंदेचा मृत्यू

0

नाशिक : बेकायदेशीररित्या गर्भचाचणी आणि गर्भपात केल्याप्रकरणी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या डॉ. बळीराम निंबा शिंदेचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथून रवाना करण्यात आला आहे. बेकायदेशीररित्या गर्भचाचणी आणि गर्भपात केल्याप्रकरणी न्यायालयाने डॉ. बळीराम निंबा शिंदे (रा. शिंदे हॉस्पिटल, मुंबई आग्रा रोड) न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

पोलीस आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाने डॉ. शिंदे यांच्या रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन आणि रुग्णालय सील केले होते. डॉक्टरविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती.

गर्भलिंगतपासणी व अवैध गर्भपातप्रकरणी शिंदे हॉस्पीटलच्या तपासात गर्भतपासणीचे साहित्य, परवानगी नसलेल्या गर्भपाताच्या गोळ्या, इंजेक्शन यासह अनेक आक्षेपहार्य गोष्टी आढळून आल्या होत्या. त्यामुळे त्याची  न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापा टाकून मुंबईनाका येथील शिंदे हॉस्पीटलची चौकशी केली़ या छाप्यामध्ये एका गर्भवती महिलेची गर्भलिंग तपासणी केल्यानंतर स्त्रीचा गर्भ असल्याचे सांगून गर्भपात केल्याचे समोर आले होते.

यावरून डॉ़ शिंदे हे गर्भलिंगतपासणी करून गर्भपात करीत असल्याचे समोर आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालय सिल करून डॉ़ शिंदे विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.

LEAVE A REPLY

*