Type to search

जळगाव

बेंडाळे स्टॉपजवळील सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांची धाड

Share

जळगाव | शहरातील बेंडाळे स्टॉपजवळील पुतळ्याजवळ सुरु असलेल्या सट्टयाच्या अड्डयावर शनिपेठ पोलीसांनी सोमवारी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ हजार ८२० रुपये रोख, एक मोटारसायकल एक मोबाईल असा ६८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बेंडाळे स्टॉपजवळ पुतळ्याजवळ सट्टा सुरु असल्याची माहिती शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विठ्ठल ससे यांना मिळाली. त्यानुषंगाने पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, परिष जाधव, हकीम शेख, संदीप पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे, किरण पाटील, योगेश बोरसे, प्रशांत पाटील यांनी याठिकाणी धाड टाकून सतिष तुकाराम सपकाळे रा. धामणगाव, रघुनाथ मोहन गजरे रा. कानळदा यांना ताब्यात घेतले. या दोघांच्या ताब्यातून २१ हजार ८२० रुपये रोख सट्टाची साधने, ४० हजार रुपयांची मोटारसायकल, ६ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ६८ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोघांविरुध्द शनिपेठ पोलीसात पोलीस कर्मचारी राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!