बॅकस्टेजच्या काव्यवाचनास प्रारंभ; 120 पेक्षा जास्त स्पर्धकांची उपस्थिती

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरच्या बॅकस्टेज आर्टिस्ट्स असोसिएशनच्यावतीने शनिवारी कथाकथन व काव्यवाचन स्पर्धा नवीन मराठी शाळा, विश्रामबाग येथे सुरूवात झाली. या स्पर्धामध्ये शिरूर, राहुरी, भिंगार व शहरातील 120 विद्यार्थ्यी व शहरातील 21 शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी तसेच इयत्ता 8 वी ते 10 वी अशा दोन गटात सुरु आहे.
या वेळी बोलतांना अमित काळे म्हणाले की, असोसिएशनच्यावतीने आम्ही गेल्या 17 वर्षपासून ही स्पर्धा भरवत आहोत. या स्पर्धमुळे मुलाना वाचनाची आवड, नाटय लेखन, स्टेज डेरिंग याची सवय लागते. याचा उपयोग मुलांची शैक्षणिक प्रगती, बृध्दीमता वाढीसाठी या स्पर्धोचा उपयोग होते. तसेच उद्या (दि.16) खुल्या गटांसाठी मनिषा स्मृती स्वलिखित काव्यवाचन स्पर्धा रावसाहेब पटवर्धन सभागृह येथे होणार आहे.
कथाकथन व काव्यवाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अभिनेत्री अश्‍विनी गिरी यांच्या हस्ते रावसाहेब पटवर्धन सभागृह सावेडी येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. तरी दोन्ही स्पर्धांसाठी भरघोस पारितोषिके असून जास्तीत जास्त स्पर्धाकांनी या स्पर्धा मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिध्द अभिनेते मिलिंद शिंदे, कमोद खराडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*