बुर्किना फासो : तुर्की कॅफेवर दहशतवादी हल्ला, 17 जणांचा मृत्यू

0

बुर्किना फासोची राजधानी औगादौगौ येथे एका कॅफेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 जण जखमी झाले आहेत.

बुर्किना फासो सरकारनंही हल्ल्याच्या वृत्ताला दुजारो दिला आहे. बुर्किना फासो सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये जवळपास 17 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये  4 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

परदेशी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या तुर्की कॅफेवर गेल्या दोन वर्षांमध्ये झालेला हा दुसरा हल्ला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

 

LEAVE A REPLY

*