बी.एड. सीईटीसाठी सहा हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

0

नाशिक :  महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालनालयातर्फे शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी बी.एड. सीईटी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत रविवारी संपली.

या परीक्षेसाठी जिल्हाभरातून सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष  –  मध्ये बीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी   एप्रिल या कालावधीत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती.

बी.एड. सीईटी परीक्षेसाठी अनेक जण अर्ज करू न शकल्याने परीक्षा अर्ज करण्यासाठी  मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या वाढीव कालावधीत तांत्रिक व वैयक्तिक अडचणींमुळे प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळाली होती.

गेल्या काही वर्षांपासून बी.एड/ अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. गेल्या वर्षी राज्यातील 52 हजार जागांसाठी केवळ  36 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्या तुलनेत नाशिकचे प्रमाण समाधानकारक असून, जिल्हाभरातील 12 महाविद्यालयांमधील सुमारे 2 हजार 250 जागांसाठी सुमारे पाच ते सहा हजार विद्यार्थी प्रवेश परीक्षेला प्रविष्ट होत असतात.

LEAVE A REPLY

*