बीसीसीआयने विचारले तरच माझे मत मांडणार : विराट कोहली

0

नवीन प्रशिक्षकाविषयी बीसीसीआयने विचारणा केल्यावरच माझे मत मांडणार असे स्पष्टीकरण कर्णधार विराट कोहलीने दिले आहे.

सध्या आम्ही वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेवरच लक्ष केंद्रीत केल्याचे कोहलीने म्हटले आहे.

बीसीसीआय सध्या नवीन प्रशिक्षकाच्या शोधात असून रवी शास्त्री यांनीदेखील या पदासाठी अर्ज केला आहे.

विराट कोहलीने वेस्ट इंडिजमधील अँटिग्वा येथे पत्रकारांशी संवाद साधला.

नवीन प्रशिक्षकाविषयी तुझी भूमिका काय असा प्रश्न विचारला असता विराट म्हणाला, मी यावर अधिक बोलू शकत नाही. एक संघ म्हणून आम्ही आमची भूमिका बीसीसीआयला सांगू असे कोहलीने सांगितले.

प्रशिक्षक निवडण्याची एक प्रक्रिया असते. यात वैयक्तिक मतांचा प्रश्नच येत नाही असे त्याने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*