बिताका प्रकल्प व शिवस्मारकसाठी निधी देवू : अर्थमंत्री मनगुंटीवार

0

अकोले (प्रतिनिधी)- तालुक्यातील बिताका प्रकल्प पुर्णत्वासाठी लागणारा निधी व विश्रामगडावरील शिवस्मारक व पर्यटनस्थळाच्या विकासासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देवू तसेच या दोन्ही प्रकल्पाच्या पुर्णतेसाठी सर्वतोपरी मदत करु असे आश्‍वासन वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

 

 

अकोल्यातील बिताका व विश्रामगडाच्या उर्वरीत कामासंदर्भात वनमंत्री ना. मुनगंटीवार यांना माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ. वैभवराव पिचड, अमृतसागरचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, संचालक रामदास आंबरे, अगस्तीचे संचालक इंजि.सुनील दातीर, माजी पं. स. सदस्य अरुण शेळके, कैलास जाधव यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देवून काम पुर्णत्वाची विनंती केली. यावेळी या दोन्ही कामात आपण व्यक्तीशः लक्ष घालून काम पुर्ण करण्यासाठी मदत करण्याचे आश्‍वासन या शिष्टमंडळास दिले.

 

 

अकोले तालुक्यातील आढळा परिसराला वरदान असलेले आढळा मध्यम प्रकल्प हे धरण गेली काही वर्षे सातत्याने भरत नव्हते मात्र माजी मंत्री पिचड यांच्या प्रयत्नातून बिताकाच्या महाकाळ डोंगरावरुन पश्‍चिअमेकडे वाहून जाणारे पाणी आढळा नदी पात्रात वळविल्याने आढळा धरण पुर्ण क्षमतेने भरण्यास मदत झाली आहे. मात्र या प्रकल्पाचे काम अद्याप अपुर्ण असल्याने आढळातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी या प्रकल्पासाठी माजी मंत्री पिचड व आ. वैभवराव पिचड यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

 

 

तसेच आढळा परीसरातील विश्रामगडावर पट्टाकिल्ला विकास व वनपर्यटन विकासांतर्गत आदिवासी विकास योजनेत छत्रपतींचे स्मारक व्हावे ही मागणी असल्याने या किल्ल्यावर अश्‍वरुढ पुतळा व्हावा या मागणीचेही निवेदन यावेळी ना. मुनगंटीवार यांना देण्यात आले.

 

 

बिताका प्रकल्पास यापुर्वी आदिवासी उपायोजनेत विशेष बाब म्हणून 3 कोटी निधी मंजूर होतो पैकी 1 कोटी निधी वनविभागाकडे शिल्लक आहे. हा प्रकल्प पुर्ण झाल्यास आढळा बारमाही होवून संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम् होणार आहे. उर्वरीत काम हे जलसंधारण विभागाऐवजी पाटबंधारे विभागाकडे देण्याची विनंतीही या निवेदनात केली असून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्‍वासन ना. मुनगंटीवार यांनी दिले आहे

LEAVE A REPLY

*