बाहेती हायस्कूलमध्ये 40 विद्यार्थ्यांना मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण

0

जळगाव । महाबळ कॉलनी येतील जानकीबाई आनंद रामजी बाहेती विद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शाडूमातीचा गणपती बनविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

गेल्या 10 वर्षापासुन शाळेत इको क्लबच्या वतीने अशी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. शाळेच्या शिक्षिका सुनिता महाजन, कलाशिक्षक प्रदीप पवार, या स्थानिक कलाकारांना बोलावून विद्यार्थ्यांना मुर्तीकलेचे प्रशिक्षण देत आहेत. मुख्याध्यापक एन.एच.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली इको क्लबच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमुर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात येते. कार्यशाळेत बनवलेल्या मुर्तीच विद्यार्थी आपल्या घरी स्थापन करतात. काही उत्कृष्ट बालमुर्तीकारांनी जास्तीच्या बनवलेल्या आपल्या मूर्ती विक्री देखील केल्या आहेत. इको क्लबतर्फे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाडूमाती उपलब्ध करुन दिली जाते. विशाल जैन, शिवाजी देशमुख, रोहन महाजन या बालकलाकारांनी मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले एकुण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

युवा विकास फाऊंडेशन विद्यामंदिर
युवा विकास फाऊंडेशन संचलित प्राथमिक विद्यामंदिर व रोटरी क्लब जळगाव सेंट्र्रल व ग्लोलब व्हिजन इंग्लिश मेडीअम स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मातीचा गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर विष्णु भंगाळे उपस्थित होते. तसेच रोटरी क्लब जळगाव सेंट्रलचे अध्यक्ष श्यामकांत वाणी, प्रशांत महाजन उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना गणपती बनविण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी ओजस्विनी कॉलेजचे बी.एफ.ए.च्या पहिल्या वर्षातील विद्यार्थी नंदु डिगंबर कुंभार उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रफुल्ल सरोदे, ग्लोबल व्हीजन इंग्लिश मेडीअमच्या शिक्षिका रेणुका भावसार, दिपक भारंबे, दिपनंदा पाटील, सारिका सरोदे, उत्कर्षा सोनवण, माधुरी कोळी, श्रध्दा वंजारी, यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

*