‘बाहुबली’चा तिसरा भागही येणार; राजामौलींची घोषणा!

0

नुकताच रिलीज झालेल्या ‘बाहुबली-२’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये कित्येक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. बाहुबलीचा तीसरा भाग येणार काय? या प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नाला आता खुद्द एस. एस. राजामौली यांनीच उत्तर दिले आहे.

‘बाहुबली’चा तिसरा भाग येईल असे त्यांनी संकेत दिले आहेत.

‘बाहुबली’चे दिग्दर्शक असलेल्या एस. एस. राजामौली यांनी आपल्या सोशल अकाउंटवरून लिहिले की, ‘सध्या बाहुबलीचे मार्केट आहे.

त्यामुळे या चित्रपटाची कथा योग्य पद्धतीने न दाखविल्यास या चित्रपटावर अन्याय होईल. जर मााझ्या वडिलांकडे चित्रपटाच्या तिसºया भागाची एखादी चांगली कथा असेल तर मी नक्कीच ‘बाहुबली-३’ बनविणार.’

राजामौली यांनी २०१५ मध्येच ट्विट करून ‘बाहुबली-३’ची घोषणा केली होती.

त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, ‘बाहुबली-३’ची निर्मिती करणार, मात्र त्यात ‘बाहुबली-२’ची कथा नसेल.

त्यावेळी त्यांनी हेही स्पष्ट केले होते की, ‘बाहुबली-२’मध्येच बाहुबलीची कथा संपणार आहे.

त्यामुळे तिसरा भाग बनवायचा झाल्यास नवी कथा लिहिली जाईल.

LEAVE A REPLY

*