Type to search

नंदुरबार

बालहक्क रक्षण आणि बालविवाह प्रतिबंधासाठी विशेष मोहीम

Share

नंदुरबार | राज्यात २५ जिल्ह्यातील ८५० गावात बालहक्क रक्षण आणि बालविवाह प्रतिबंधासाठी व्हीएसटीएफ आणि युनिसेफची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. महाराष्ट्र ग्राम परिवर्तन प्रतिष्ठान, संयुक्त राष्ट्रांचा बाल आपत्ती निधी – युनिसेफतर्फे ही मोहिम राबवली जाईल. त्यास १५ ऑगस्टला प्रारंभ झाला. तीन महिने ही मोहिम राबवण्यात येइल. बालहक्क रक्षणाचे आणि बालविवाह प्रतिबंधाचे महत्व याबद्दल जनजागृती करण्यात येईल.

पहिला टप्पा १५ ते ३० ऑगस्ट दरम्यान आहे. यात ग्रामसभेतून ग्रामस्थांना या समस्यांची माहिती दिली जाईल. सभेत बालहक्कांचे प्रभावीपणे रक्षणाचा ठराव संमत केले जातील. तसेच मुख्यमंत्री ग्राम विकास बालहक्क रक्षण समित्या स्थापन करतील. १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार एकूण निधीच्या दहा टक्के रक्कम महिला आणि बालकांच्या योजनांसाठी राखून ठेवली पाहिजे याची जाणीव निर्माण करतील आणि हा निधी योग्य कारणांसाठी खर्च होत आहे याकडे लक्ष ठेवतील. बालकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने १८ व्या वर्षापर्यंत शिक्षणासाठी प्रयत्न होतील. दुसरा टप्पा ११ ऑक्टोबरला म्हणजे आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी सुरु होईल. यात बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या अमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले जाईल. बालविवाह या समस्येशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शाळांमध्ये बैठका होतील. बचतगट कार्यकर्त्यांशी बालविवाह समस्येविषयी चर्चा केली जाईल. युनिसेफचे अधिकारीही या प्रक्रियेत सहभागी होतील. तिसरा टप्पा १४ नोव्हेंबरला सुरु होईल. ग्रामस्थांना बालविवाह प्रथेचे अनिष्ट परिणाम समजावून सांगितले जातील आणि असे विवाह रोखण्यासाठीच्या कायद्यांची आणि इतर उपाययोजनांची माहिती दिली जाईल. बालविवाह कसे घातक असतात आणि असा एखादा विवाह होत असेल तर त्याची माहिती सरकारी आणि प्रशासकीय यंत्रणेला कशी द्यायची याबद्दल ग्रामस्थांना प्रशिक्षित केले जाईल.

स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना भाजपातर्फे श्रद्धांजली
नंदुरबार| प्रतिनिधी- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे माळीवाडा परिसरात प्रतिमापूजन व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. डॉ हिना गावित, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, चिटणीस माणिक माळी निलेश माळी गटनेते चारुदत्त कळवणकर नगरसेवक आनंद माळी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, गणेश माळी, संतोष वसईकर, गौरव चौधरी, सिंधूबाई माळी, संगीता सोनवणे, सविता जयस्वाल, डॉ. सपना अग्रवाल, रघुनाथ माळी, सदानंद रघुवंशी, निलेश पाडवी, लक्ष्मण माळी, पंकज जैन, मिलिंद मोहिते, संजय मोहिते, संजय पाटील, लियाकत बागवान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते पस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!