बार्सिलोना, गिरोना क्लब स्पॅनिश लीग खेळणार!

0

गिरोना । स्पॅनिश लीगचे अध्यक्ष तसेच बार्सिलोना आणि गिरोना फुटबॉल क्लबने अमेरिकेमध्ये स्पॅनिश लीगचा सामना खेळण्यासाठी स्पेन ्फुटबॉल महासंघ (आरएफईएफ) के परवानगी मागितली आहे. या निर्णयाच्या विरोधात मात्र प्रशंसक आणि खेळाडूमध्ये विरोधाची स्थिती निर्माण होऊ शकते आहे.

स्पॅनिश लीगचे अध्यक्ष जेव्हियर टेबास, बार्सिलोनाचे प्रमुख जोसेफ मारिया आणि गिरोनाचे प्रमुख डेल्की गेलीनी मियामीच्या हार्ड रॉक मैदानामध्ये स्पॅनिश लीग सामना खेळण्याची परवानगीसाठी अजून एक पाऊल उचले आहे. हे पाऊल अमेरिकेमध्ये स्पॅनिश लीग फुटबॉलला लोकप्रिय बनविण्यासाठी उचलण्यात आले आहे.

स्पॅनिश लीगने प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले की असे मानले जात आहे की बार्सिलोना आणि गिरोना क्लबच्या प्रशंसकानी याला हिरवा झेंडा दाखविला आहे. स्पेनिश फुटबॉल महासंघाने या आधीच आशा विनंतीला फेटाळले आहे.

दरम्यान, स्पॅनिश लीगमध्ये खेळण्याबाबत बार्सिलोना आणि गिरोना क्लबचे खेळाडू कमालीचे उत्सूक असून या खेळाडूंप्रमाणेच त्यांच्या चाहत्यांमध्ये सुध्दा आपल्या लाडक्या खेळाडूंना या स्पर्धेत खेळतांना पाहण्याची इच्छा आहे. मात्र, स्पॅनिश फुटबॉल महासंघाने कठोर भुमिका घेतली असून अशा प्रकारच्या कोणत्याही मागणीला परवानगी देता येणार नसल्याचे सांगितल्याने सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*