‘बारा-मतीच्या करामती’चे चित्रिकरण

0
दे. कॅम्प | दि. ३० वार्ताहर- येथील ब्रिटीशकालीन वास्तू या नेहमीच विविध चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी कायम आकर्षण राहिल्या आहेत. त्यात आजपासून येथील ब्रिटीशकालीन भाटिया सॅनेटरीमधील संजय गिज यांच्या चाळीत नाशिकचे दिग्दर्शक व निर्माते असलेल्या ‘बारा-मतीच्या करामती’ या मालिकेचे चित्रिकरण सुरू करण्यात आले. यावेळी बेलतगव्हाण रोडवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.

हास्यसम्राट व लेखक प्रकाश भागवत यांनी लिहिलेल्या कथानकावर आधारित मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार सुनील गोडबोले यांच्यासह नाशिकमधील प्रकाश राणे, शिवाजी रेडकर, पूजा कृष्णा, सचिन सुरेश, पांडुरंग भारती, शुभांगी सरोदे, दीपक सरोदे आदींच्या भूमिका असून संपूर्ण मालिका केवळ मनोरंजनात्मक स्वरुपाची आहे.

एका चाळीतील बारा घरांमध्ये विविध भाषिक एकत्र राहताना काय गंमती घडतात हे या मालिकेत दाखवण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक आनंद बच्छाव यांनी सांगितले. तर संजय गिज यांनीदेखील नाशिकच्या कलाकारांना मिळत असलेले प्रोत्साहन बघून चित्रिकरणासाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली. कार्यकारी निर्माता म्हणून पद्मनाभ राणे हे काम पाहत आहेत.

LEAVE A REPLY

*