बारावी @ 92% , यंदाही पोरीच भारी

0
 विभागात नगरची बाजी

जिल्हा – आर्टस् 83.12  सायन्स 97.67  कॉमर्स 95.58

अहमदनगर (प्रतिनिधी) -राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2017 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (मंगळवार) ऑनलाईन जाहीर झाला असून, जिल्ह्याच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातून 61 हजार 271 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यात 56 हजार 457 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 92. 14 टक्के लागला आहे.  मुलींच्या निकालाची टक्केवारी 94.94 टक्के तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 92.14 टक्के आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल 41.16 लागला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांनी दिली.    बारावीसाठी मार्च 2017 परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 64 हजार 126 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. यातून परीक्षेला 61 हजार 271 विद्यार्थी बसले होते. यात 56 हजार 457 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निकाल 92. 14 टक्के लागला आहे. नियमित, खासगी असे मिळून 37 हजार 829 विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. यात 32 हजार 871 विद्यार्थी पास झाले असून निकालाची टक्केवारी 86.89 टक्के आहे. तर 25 हजार 938 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसल्या होत्या. यातून 24 हजार 607 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून निकालाची टक्केवारी 94. 94 टक्के असल्याचे शिक्षण मंडळाच्यावतीने जाहिर करण्यात आले आहे.
परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. त्यासाठी पाच जूनपासून अर्ज भरण्यास सुरवात होईल. परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसर्‍या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिकेच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह बुधवार (ता. 31) पासून नऊ जूनपर्यंत विहीत शुल्क भरून अर्ज करता येईल. छायाप्रतीसाठी देखील बुधवारपासून 19 जूनपर्यंत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेचे फेरमूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. ती मिळाल्यानंतर दुसर्‍या दिवशीपासून शुल्क भरून विद्यार्थ्यांना विभागीय मंडळांकडे अर्ज करता येतील. फेरपरीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर नंतर जाहीर केले जाणार आहे, असे मंडळाच्यावतीने जाहिर करण्यात आले आहे.

रेसिडेन्शिअल एकूण – 94.21
आर्टस् – 80.51
कॉमर्स – 97.48
सायन्स – 99.70

न्यू आर्टस् कॉलेज एकूण – 91.05
आर्टस् – 71.71
कॉमर्स – 97.72
सायन्स – 99.62

अहमदनगर कॉलेज एकूण – 85.42
आर्टस् – 64.17
कॉमर्स – 89.00
सायन्स – 91.25

सारडा कॉलेज एकूण – 94.75
आर्टस् – 76.25
कॉमर्स – 97.11
सायन्स – 99.55

भाऊसाहेब फिरोदिया एकूण – 99.53
कॉमर्स – 100.00
सायन्स – 98.85

अकोले – 91.42
जामखेड – 91.99
कर्जत – 94.19
कोपरगाव – 88.02
नगर – 91.40
नेवासा- 90.58
पारनेर – 95.68
पाथर्डी – 92.60
राहाता – 93.74
राहुरी – 93.11
संगमनेर – 93.28
शेवगाव – 92.53
श्रीगोेंदा – 93.46
श्रीरामपूर – 90.21

शंभर नंबरी शाळा : 
ऑक्झीलियम कॉन्व्हेंट स्कूल, सावेडी
पी.ए. इनामदार, गोविंदपुरा
प्रियदर्शनी ज्युनिअर कॉलेज, पाथर्डी रोड
मातोश्री भागुबाई भांबरे
एफर्टस् ज्युनिअर कॉलेज, धनगरवाडी
कॉलेज ऑफ इन्फॉरमेंशन टेक्नॉलॉजी

LEAVE A REPLY

*