बारवरील धाडीत ‘या’ सनदी अधिकाऱ्यांची मुले सापडली…अशी आहेत नावे

0

नाशिक : उच्चपदस्थ सनदी अधिकार्‍यांच्या मुलांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास इगतपुरी येथील मिस्टिक व्हॅलीत धिंगाणा घालण्याचा प्रकार इगतपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला.

दारुच्या नशेत तर्रर्र होऊन बारबालांसह धिंगाणा घातल्याप्रकरणी 13 मुलांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. काल सोमवारी दिवसभर त्यांची चौकशी झाली. तद्नंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली असल्याचेदेखील समजते.

याप्रकरणी सनदी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. इगतपुरी शहरातील तळेगाव शिवारात  मुंबई आग्रा महामार्गावरील एका प्रतिष्ठित हॉटेल परिसरातील बंगल्यात सुरु असलेल्या बॅचलर पार्टीवर इगतपुरी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री धाड टाकून ४ युवतींसह ९ जणांना अटक केली. यात उच्चभ्रू व प्रतिष्ठित घरातील  सुशिक्षित तरुण अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली असून, रोकड सह मद्य जप्त करण्यात आले आहे.

इगतपुरी शहरातील तळेगाव शिवारात मुंबई आग्रा महामार्गावरील मिस्टिक व्हॅली या प्रतिष्ठित हॉटेल परिसरात ११ क्रमांकाच्या बंगल्यात काही तरुण तरुणी मोठ मोठ्या आवाजात लाऊड स्पीकरवर गोंधळ घालत असल्याची माहिती मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते शशीकांत कुलकर्णी रा. मुंबई यांनी इगतपुरी पोलिसांना दिली.

या माहितीच्या आधारे इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली. यात या बंगल्यामधे मोठ्या आवाजात लाऊड स्पिकरवर मद्यधुंद अवस्थेत काही तरुणी ह्या तोकड्या कपड्यात अश्लील हावभाव करून घुंगरू बांधून नाचत होत्या. नाचत असताना त्या तरुणींवर काही तरुण पैसे उधळताना दिसून आले. विशेष म्हणजे यात काही १० रुपयांच्या नोटा ह्या बनावट होत्या.

हा सर्व प्रकार पाहून पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी तात्काळ हा प्रकार थांबवत ४ तरुणींसह ९ जणांना ताब्यात घेतले. घटना स्थळावरून पोलिसांनी ५७ हजार रुपये रोख जप्त केले आहे. त्यात १० रुपयांच्या नकली ३२३० रुपयांच्या नोटा, मारुती इर्टिगा क्रमांक एम. एच. ०२ सी. आर. ४३६६, लॅपटॉप, २ स्पीकर, १ एम्प्लिफायर  ३ ब्लॅक लेबलच्या ७५० मी लीच्या सीलबंद दारू बाटल्या, १ अप्सुलेट वोडका बाटली असा ऐवज जप्त करण्यात आला.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे इगतपुरीसह जिल्ह्यात याविषयी चर्चा सूरु असून या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश वराडे यांच्या फिर्यादी नुसार भा दं वि सं २९४, मुंबई पो कायदा कलम ११२/११७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो नि संजय शुक्ला यांच्या मारदर्शनाखाली सहा पो नि महेश मांडवे करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेले प्रतिष्ठित व व्यवसायिक असलेले संशयित आरोपी : १) पृथ्वीराज युवराज पवार, वय २८, व्यवसाय बिल्डर, रा. सावरकर नगर, गंगापुर रोड, नाशिक, २) सुमित श्रीराम देवरे, वय ३०, व्यवसाय बिल्डर ३) कस्तुभ विश्वास जाधव, वय २७, पवन नगर, नाशिक ४) सुशांत जिभाऊ गांगुर्डे, वय ३१, व्यवसाय व्यापारी, रा. सावरकर नगर, गंगापुर रोड, नाशिक

५) ललीत सुनिल पाटील वय २७ व्यवसाय वैद्यकीय रा. मिथीला नगरी, पिंपरी चिंचवड, पुणे ६) शब्बीर आजिम खान वय ५६ रा. काशमिरा मिनाक्षी नगर, ठाणे ७) जितनबी मोहम्मद हनिफ, वय ३६ रा. वर्सोवा, अंधेरी वेस्ट, मुंबई ८) रजिया गुलाब शेख, वय २८ रा. मिरारोड, मुंबई ९) अंजना महादेव मंडल, वय ३१ रा. मिरा भाईदंर रोड, मुंबई १०)  शहनाज युसुफ शेख, वय ३० मिरारोड, मुंबई

११) चिन्नामा अंजिलीया दानिया वय २४ रा. मिरा भाईदंर रोड, मुंबई १२) रहाना अब्दुल हाफिज वय ३१ रा. मालाड पश्चिम मुंबई, १३) धर्मेन्द्रकुमार दिनेशकुमार सिंग वय ३२ रा. नेहरू रोड, सांताक्रुज, मुंबई,वाहन चालक अशी नवे आहेत.

LEAVE A REPLY

*