‘बाबूमोशाय बंदूकबाज’मध्ये झळकणार नवाजुद्दीन!

0

एखादी व्यक्तीरेखा साकारण्यासाठी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी खूप कष्ट घेत असतो, त्यामुळे त्याची भूमिका नेहमीच हटके असते.

आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटात तो वेगळी भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने चक्क जेम्स बाँडचे चित्रपट पाहिले आहेत.

नवाजुद्दीनने जेव्हा ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा त्याच्या डोक्यात सर्वात पहिल्यांदा जेम्स बाँड आला. चित्रपटातील त्याची व्यक्तीरेखा जेम्स बाँडसारखी नसली तरी त्याला ही भूमिका हटके करायची आहे.

त्याने जेम्स बाँडची बंदूक धरण्याची पध्दत, चौफेर नजर, आक्रमकपणा, चपळाई याचा अभ्यास केला आहे. नव्या चित्रपटात तो याचा चपखल वापर करणार आहे. ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ चित्रपटाची निर्मिती किरण शाम श्रॉफ यांची असून यात दिव्या दत्ता, बिदीता बाग, मुरली शर्मा, जतीन गोस्वामी, श्रध्दा दास, अनिल जॉर्ज, जीतू शिवरे आणि भगवान तिवारी यांच्या भूमिका आहेत.

LEAVE A REPLY

*