बाबांमुळेच मला अधिक ओळखतात : अथिया शेट्टी

0

अभिनेता सुनील शेट्टची मुलगी अथिया शेट्टीने स्टार किड असल्याच्या फायद्यांपेक्षा नुकसानच जास्त आहे कारण यासर्वांमध्ये घराणेशाहीचा सगळ्यात जास्त सामना करावं लागणं हीच समस्या असल्याचं तिने सांगितले.

अथिया पुढे म्हणाली की, एक स्टार कीडला जसे फायदे असतात तसेच तोटेही असतात. आम्हाला सिनेसृष्टी आणि प्रसारमाध्यमांकडून सतत प्रेम मिळतं, याचं मुख्य कारण माझे बाबा आहेत. पण घराणेशाहीचे आरोपही आम्हाला सहन करावे लागतात. २०१५ मध्ये आलेल्या ‘हिरो’ सिनेमातून अथियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

स्टार किड असल्यामुळे तुम्हाला पहिला सिनेमा तर सहज मिळून जातो. पण आम्ही अशा इण्डस्ट्रीमध्ये आहोत जिथे उत्कृष्ट काम असेल तरच तुम्ही टीकू शकता. जर तुमच्यात टॅलेण्ट नसेल आणि तुमच्या मागे प्रेक्षक नसतील तर बॉलिवूडमध्ये टिकून राहणं निव्वळ अशक्य आहे.

आपल्या आगामी सिनेमाबद्दल बोलताना अथिया म्हणाली की, माझ्या २१ व्या वाढदिवसा दिवशी मी हा सिनेमा स्वीकारला. त्यामुळे हा सिनेमा माझ्यासाठी फार खास आहे.

LEAVE A REPLY

*