बहुविवाह पद्धतीवर चर्चा नाही : सुप्रीम कोर्ट

0

सर्वोच्च न्यायालयात आजपासून पाच सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात झाली.

हा खटला लवकरात लवकर निकालात काढण्यासाठी आजपासून दररोज या प्रकरणाची सुनावणी घेण्यात येणार आहे.

यावेळी न्यायालयाकडून मुस्लिम समाजातील बहूपत्नीत्व आणि ‘निकाह हलाल’बाबत पक्षकारांची बाजू ऐकून घेण्याचेही मान्य केले.

मात्र, बहुपत्नीत्वाच्या प्रथेसंदर्भात न्यायालय कोणतीही चर्चा करणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

घटनापीठात सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्यासह न्या. कुरियन जोसेफ, न्या. आर.एफ. नरिमन, न्या. यू.यू. ललित आणि न्या. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. गुरुवारच्या सुनावणीत कोर्ट सर्वप्रथम सुनावणीचे मुद्दे निश्चित करत आहे.
केंद्र सरकार, याचिकाकर्त्या महिला आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासह सर्व पक्षकारांनी सुप्रीम कोर्टासमोर लेखी युक्तिवाद सादर केलेले आहेत. याआधारे सुप्रीम कोर्ट स्वत: सवाल ठरवणार आहे. सुनावणीत त्यांच्यावरच विचार केला जाईल. सुप्रीम कोर्टाने आधीच आपण समान नागरी संहितेच्या मुद्द्यावर सुनावणी करत नसल्याचे स्पष्ट केलेले आहे.

LEAVE A REPLY

*