Type to search

नंदुरबार

बहिणीचे भेट घेवून परतणार्‍या दोघा भावांचा अपघाती मृत्यू

Share
नांदगाव : पोटच्या मुलीचा बापासमोर मृत्यू तर पत्नीने दवाखान्यात सोडला जीव Nandgoan Wife and Daughter Dead in Eicher-Motorcycle Accident

नंदुरबार – नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे रक्षाबंधनानिमित्त बहिणीचे भेट घेवून गावी निघालेल्या दोघा भावांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघा भावांचा मृत्यू झाला. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,खापरखेडा येथील सुनिल मालचे (19) व वसंत मालचे (18) हे चुलत भाऊ होते. त्यांनी दि.10 रोजी सकाळी आपल्या नातेवाईकाला वडाळी येथे सोडले. त्यानंतर आपल्या बहिणीला भेटण्यासाठीसाक्री येथे गेले. बहिणीच्या घरी त्यांनी जेवण केले. त्यानंतर दोघे भाऊ पुन्हा घरी येण्यासाठी आपली दुचाकी घेवून निघाले. आष्टे गावाजवळ नंदुरबारहून साक्रीकडे जाणार्‍या ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील सुनिल भिलू मालचे याचा जागीचा मृत्यू झाला. वसंत मालचे हा गंभीर जखमी झाला होता.

अपघात झाल्यानंतर आष्टे येथील ग्रामस्थांनी जखमी वसंतला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतांनाच त्याचा मृत्यू झाला. नंदुरबार येथील शासकीय रूग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. खापरखेडा येथे त्या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!