बहिणीची लग्नपत्रिका वाटपास जाताना अपघात ; भाऊ जखमी

0

मोखाडा : शहरापासून २० किलो मीटर अंतरावर असलेल्या बेरिस्ते गावाजवळ बस आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. बहिणीच्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी जात असतांना हा अपघात घडला. जीवीतहानी टळली असली तरी मुलीचा भाऊ जखमी झाला आहे.

याठिकाणी धोकादायक वळण होते. एस.टी महामंडळाच्या जव्हार बस आगारातील बस क्रमांक एम.एच.०६.एस ८७४५ व मोटार सायकल वाहन क्रमांक एम.एच.०५.जे.१७८९ दोघाही वाहनांच्या चालकांना अंदाज न आल्याने दोन्ही वाहने समोरासमोर धडकली.

या अपघातात मोटारसायकल चालक कैलास लहारे आपल्या बहिणीच्या लग्नानिमित्त निमंत्रण द्यायला जात असतांना हा अपघात घडला. बस चालक दिगंबर खरे यांच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात होण्याचे टळले असल्याचे प्रत्यक्ष दर्शंनी यावेळी सांगितले.

बस व मोटारसायकलमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये कैलास लहारे या तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असुन चेतन महाले हा बेशुध्द अवस्थेत होता.

दरम्यान दोघा जखमींना मोखाडा ग्रामीण रुग्णालयातुन नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविन्यात आल्याचे मोखाडा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी चौथे यांनी सांगितले.

या अपघाताचा तपास ए एस आय चव्हाण ,पो ना शिरसाठ, पो ना पी एस विटकर, पो ना मनोज भरसट करत आहेत.

LEAVE A REPLY

*