बहाळ येथील शेतकर्‍यांची फसवणूक – कणसांना दाणेच नाहीत ?

0

बहाळ, ता.चाळीसगाव | वार्ताहर : यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकर्‍यांनी उन्हाळी बजारीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शेतकर्‍यांनी गावातीलच कृषी केंद्रामधूत बायोस्टड कंपनीचे हायपर प्लस ५१ हे बाजरीचे वान खरेदी करुण पेरणी केली.

बाजरीच्या पिकांची चांगल्या पद्धतीने वाढ झाली, कणीसही आले, परंतू कणसाला दाणेच येत नसल्याने शेतकर्‍यांची फसगत झाली आहे. जवळपास १०३ हेक्टर बाजरीच्या पिकाच्या कणसाला दाणेच न आल्यामुळे शेतकर्‍यांचे आथिर्क नुकसान झाले आहे. संपूर्ण पिकाची भरपाई मिळावी तसेच संबधीत कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली आहे.

बहाळ गावातील ८० टक्के शेतकर्‍यांनी यावर्षी जवळपास १०३ हेक्टर साधारणत: २५५ ते २६० एकेर उन्हाळी बाजरीच्या पिकांची लागवड केली आहे. यासाठी शेतकर्‍यांनी गावातीलच कृषी केंद्रातून बायोस्टड कंपनीचे हायपर प्लस ५१ हे बाजरी चे वान (ज़ात) खरेदी करुण पेरणी केली होती.

यासाठी प्रत्येक शेतकर्‍याला ऐकरी ११००० हजार पर्यत्न खर्च आला आहे. तसेच बाजरीच्या पिकाला वाढण्यासाठी सहा महिन्यांचा कालवंधी लागला. पिक जोमात वाढत असल्याने शेतकरी गेल्या सहा महिन्यांपासून समाधानी होता. बाजरीच्या पिकाला कणीस देखील मोठे आले. परंतू कणासाला दाणेच येत नसल्याने शेतकर्‍यांची फसगत झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे.

लागवडीची खर्च तसेच सहा महिन्यांचा उत्पन्नाचा कालवंधी वाया गेला आहे. कृषी केंद्र विक्रेत्याकडून बियाणे विक्री करतांना ऐकरी २० ते २२ पोत्यांच्या उतार्‍याची हमी देण्यात येत होती. फसगत झाल्याचे लक्षात येताच शेतकर्‍यांनी तालुका कृषी आधिकारी यांच्याकडे तक्रार केली असताना त्यांनी घटनास्थळी भेट देऊन बाजरीच्या पिकाची पाहणी केली आहे.

शेतकर्‍यांचे ऐकरी ४२००० ते ४५००० नुकसान झाले आहे तरी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. अन्यथा सर्व शेतकरी तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

यासबंधीत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवदेन देण्यात आले असून त्यांनी शेतकर्‍यांना न्या मिळऊन देण्यांचे आश्‍वासन दिले आहे. यावेळी साहेबराव् महाजन भावडू माळी, नेमीचन्द माळी, वसंत भोई, शौकत मलिक, जिभाऊ माळी, संदिप वाणी, रावसाहेब पाटील, संतोष भोई, राहुल पगारे, बाबा नितिन पगारे आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*