‘बस स्टॉप’वर भेटणार मराठीतील दिग्गज कलाकार!

0

ब-याचदा सिनेमाचं पोस्टर किंवा ट्रेलरही सोशल मीडियावर जारी केलं जातं.

याशिवाय सिनेमाच्या रिलीजची तारीखही सोशल मीडियावरुन जाहीर करण्याचा सेलिब्रिटींचा फंडा आहे. नुकतंच मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनं तिच्या आगामी मराठी सिनेमाची घोषणा करण्यासाठीही सोशल मीडियाचा आधार घेतला.

सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवरुन अमृतानं तिच्या आगामी बस स्टॉप या सिनेमाची घोषणा केली. 21 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

ब-याच काळानंतर अमृता मराठी सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे तिच्या या बस स्टॉपची रसिकांना उत्सुकता असेल.

ऑनलाईन-बिनलाईन आणि बघतोस काय मुजरा कर या सिनेमांच्या यशानंतर निर्माता श्रेयश जाधव बस स्टॉप हा सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या सिनेमात अमृतासह अनेक दिग्गज कलाकार दिसणार आहे.

अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

गणराज असोशिएट्स प्रस्तुत या सिनेमाचे दिग्दर्शन समीर हेमंत जोशी यांनी केलं आहे. पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या निर्मात्यांचंदेखील या सिनेमात योगदान  आहे.

तरुणांचे आवडते संगीतकार जसराज, हृषीकेश, सौरभ यांनी या सिनेमाला संगीत दिलंय.

अभिजित अब्दे यांच्या कॅमे-यातून या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*