बळीराजाला कर्जमाफी दिल्याबद्दल आदिवासी भागात शेतकर्‍यांचा जल्लोष

0
बोराडी । दि.12 । वार्ताहर-महाराष्ट्रात बर्‍याच दिवसापासून बळीराजाचे कर्जमाफी, शेतमालास हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी राज्यातील शेतकर्‍यांनी केलेले आंदोलन चालू होते, या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यसरकारच्या मंत्रीमंडळाच्या सदस्यांनी कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सध्या सुरू असलेली आंदोलने मागे घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करून गेल्या आठवडयात शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती.

परंतु त्याला अवधी 31 ऑक्टोंबरची होती. बळीराजाची भावना लक्षात घेऊन कर्जमाफीबाबतचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली.

या घोषणेनंतर शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच शिरपूर ग्रामीण आदिवासी भागात या निर्णयानंतर आनंदाचे वातावरण निर्माण होऊन भाजपा कार्यकर्ते व शेतकरी बंधूंनी जल्लोष करून एकमेकांना मिठाई खाऊ घातली.

तसेच बोराडी, कोडीद, न्यू बोराडी, फत्तेपूर, बोरपाणी, फत्तेपूर, चाकडू व इतर अशा आदिवासी भागातील मोठ्या ग्रुप ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासनाचा अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर केला.

राज्यातील सर्व शेतकर्‍यांची कर्जे एक लाख 34 हजार कोटी रुपयांच्या घरात असून ती माफ करणे कोणत्याही सरकारला शक्य नव्हते. परंतु महाराष्ट्राचे धाडसी सरकारने घेतला आहे.

शेतकर्‍यांची कर्जे ही एक लाख रुपयांच्या मर्यादेतीलच असल्याने त्यांच्यासाठी बँकांना दोन-चार दिवसांतच सूचना दिल्या जातील व थकबाकीदार शेतकर्‍यांना त्वरित पीककर्ज वितरण सुरू होईल.

त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नव्याने एक उमीद निर्माण होणार आहे. यावेळी दिलीप पावरा भाजपा तालुका उपाध्यक्ष भारत विजय पावरा, संतोष पावरा, गौतम सोनवणे विलास पाटील, मंजा पावरा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*