Type to search

maharashtra जळगाव

बदलत्या खाण्याच्या सवयीमुळे आयडीबीचे वाढले रुग्ण

Share
जळगाव । बदलती जीवन शैली, बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी, पाश्चिमात्य देशातील पदार्थांचा आहारातील समावेश व भारतीय आहाराकडे होणारे दुर्लक्ष हे आजाराचे मुख्य कारण मानले जाते. एका संशोधनानुसार या आजाराचे भारतात सन 2030 पर्यंत सर्वात जास्त रुग्ण असतील. या आजाराच्या जागृतीसाठी शोभा हॉस्पिटल अ‍ॅण्ड सुपर स्पेशालिटी गॅस्ट्रोएन्टरोलॉजी सेंटरतर्फे आयडीबी रुग्णांसाठी एज्युकेशनल वर्कशॉप दि.19 मे रोजी घेतले, अशी माहिती रविवारी डॉ.ऋषिकेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयडीबी या आजारामध्ये अल्सरेटीव्ह कोलायटीस आणि क्रॉन्स डिसीस हे मुख्यत्वे करुन दोन आजार आहे. अल्सरेटीव्ह कोलायटीस हा मोठ्या आतड्याचा आजार आहे. क्रॉन्स डिसीस हा लहान व मोठ्या आतड्याचा आजार आहे. पूर्वी पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणात आयडीबी आढळणारे हे आजार आता भारतात मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. या वर्कशॉपमध्ये जर्मनीवरुन प्रो.डॉ.क्रीस जर्जेस यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.

रुग्णांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मयुर मुठे, आहार तज्ज्ञ मृदूला कुळकणी आणि योग अभ्यासक शंतनू खांबेटे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. जळगावातील सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टरोलॉजीस्ट व लिव्हर तज्ज्ञ डॉ.ऋषिकेश चौधरी यांनी या कार्यक्रमात रुग्णांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी डॉ.योगेश चौधरी, डॉ.मेघा चौधरी, डॉ.स्नेहा चौधरी, योगेश पाटील, भुषण चौधरी, अभिजीत चौधरी, शोभा हॉस्पिटल कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!