बटाटे व गहू घेऊन जाणारे वाहने अडवली

0

पोहेगाव बंद; रस्त्यावर भाजीपाल्याचा खच

 

रांजणगाव देशमुख/सोनेवाडी (वार्ताहर)- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव शुक्रवारी बंद ठेवण्यात आले. शेतकरी संपाला पाठिंबा देत दुसर्‍या दिवशी ही शेतकरी आक्रमक झाले. कोपरगाव संगमनेर रस्त्यावर शेकडो शेतकर्‍यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत शेतमाल घेऊन जाणारे वाहने अडवून वाहनातील बटाटे व गहू वाहनातून खाली काढून रस्त्यावर फेकला.

 
सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी द्या, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी राज्यव्यापी संपाला पोहेगावने उत्स्फूर्त पाठिंबा दिला. यावेळी व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपात सहभाग नोंदविला. हजारो संख्येने शेतकर्‍यांनी रोडवर एकत्र येत संगमनेर, कोपरगाव रस्त्यावर बटाटे व गहू घेऊन जाणारे दोन ट्रक अडवले.

 

 

मुख्यमंत्री संपाकडे गांभीर्याने बघत नसल्याने शेतकर्‍यांंनी ट्रकमधील बटाटे व गहू रोडवर फेकून दिले. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही कोलमडून गेली. शिर्डी पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक मूलगिर यांनी फौजफाटा येथे बोलवून आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

*